शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

हॅरिस पुलावरील कोंडी सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 4:59 AM

पुणे-मुंबई महामार्ग : जूनच्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीसाठी मार्ग होणार खुला

पिंपरी : पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरी आणि पुण्याला जोडणाऱ्या दापोडीतील हॅरिस पुलाला समांतर पूल उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पूल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे हरिस पुलावर होणारी वाहतूककोंडी सुटणार आहे.पिंपरी-चिंचवड व पुणे या दोन्ही शहराच्या सीमेवरील मुळानदीच्या तीरावर एकीकडे दापोडी व दुसरीकडे बोपोडी आहे. वाहतूक वाढल्याने तसेच बीआरटी, मेट्रोने वेग घेतल्याने शंभर वर्षांपूर्वीचा पूल हा अपुरा पडत होता. त्यामुळे वाहतूककोंडीचे प्रमाण वाढत होते. ही कोंडी फोडण्यासाठी दोन्ही शहरांच्या महापालिकेने समांतर पूल उभारण्याचे काम सुरू केले होते. दापोडीतून खडकीत जाणाºया पुलाचे काम पूर्ण होत आले आहे. याची पाहणी महापालिका अधिका-यांनी आज केली. या वेळी बीआरटीएसचे कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, बीआरटी प्रवक्ता विजय भोजणे उपस्थित होते. पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, पुलावर डांबरीकरण सुरू आहे. तसेच पादचारी मार्गावर रेलिंग बसविण्याचे काम सुरू असल्याचे दिसून आले.हॅरिस पुलाच्या कामाला ६ एप्रिल २०१५ ला साठ कोटींना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. १७ फेब्रुवारी २०१६ ला २२.४६ कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली होती. या पुलासाठी सी. व्ही़ कांड यांना सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. तर वालेचा इंजिनिअरिंगला हे काम देण्यात आले होते. या कामासाठी २४ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत २२ मे रोजी संपली आहे. मुदतीत काम पूर्ण होऊ शकले नाही. सत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे.समांतर दोन पूलहॅरिस पुलाला दोन्ही बाजूंनी समांतर पूल उभारण्याचे काम सुरू आहे. पुलाची लांबी ४१० मीटर असून, रूंदी १०.५० मीटर आहे. पुलावर संरक्षक कठडे, विद्युत विषयक कामे सुरू आहेत. तसेच सीएमईसाठी भुयारी मार्गही काढण्यात आला आहे. बोपोडीतून पिंपरीकडे येणारा पुलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, भूसंपादनामुळे नदीतीरावरील रस्त्याला जोडण्याचे काम अपूर्ण आहे. भूसंपादन होताच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.वर्षाची मुदतवाढपुणे महापालिका हद्दीतील रस्त्यालगतच्या झोपड्या हलविलेल्या नाहीत. जागेचा ताबा न मिळाल्याने पूल तयार होऊनही तो जागेअभावी बोपोडीला जोडला गेला नाही. यासाठी पुणे महापालिकेबरोबर पत्रव्यवहार केला आहे. मात्र, भूसंपादन कारवाई न झाल्याने जागेअभावी पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या कामास एक वर्षांची मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.पावसाळ्यात काम बंदमुळा नदीवरील हॅरिस पुलाच्या एका समांतर पुलाचे काम अपूर्ण आहे. जागेअभावी काम रखडले आहे. अजूनही जागा मिळालेली नाही. पाऊस कोणत्याही क्षणी सुरू होईल. त्यामुळे पावसाळ्यात चार महिने या पुलाचे काम करणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रशासनास पुलाचे काम थांबवावे लागणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड