रहाटणीकर समस्येने हैराण

By Admin | Updated: October 14, 2016 05:37 IST2016-10-14T05:37:59+5:302016-10-14T05:37:59+5:30

पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर राहावे म्हणून पालिका प्रशासन दर वर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, आपले शहर खरेच स्वच्छ व सुंदर

HariNiakaran problem by harana | रहाटणीकर समस्येने हैराण

रहाटणीकर समस्येने हैराण

रहाटणी : पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर राहावे म्हणून पालिका प्रशासन दर वर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, आपले शहर खरेच स्वच्छ व सुंदर आहे का, असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे .
रहाटणी परिसरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. या ठिकाणी कचराकुंडी नसल्याने नागरिक मोकळ्या जागेत कचरा टाकत आहेत. अनेक वेळा हा कचरा वाऱ्यामुळे रस्त्यावर पसरत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
रहाटणी चौक, नखाते वस्ती चौक, रहाटणी फाटा यांसह अनेक परिसरात ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. पूर्वी या ठिकाणी कचराकुं ड्या होत्या. मात्र, घरोघरी कचरा उचलण्यासाठी गाड्या जात असल्याचे कारण पुढे करत परिसरातील कचराकुंड्या काढून टाकण्यात आल्या आहे. ज्या ठिकाणी कचराकुंड्या होत्या, त्या ठिकाणी पालिकेच्या वतीने या ठिकाणी येथे कचरा टाकू नये, असे फलक लावले आहेत. तरीही नागरिक या ठिकाणीच कचरा टाकत आहेत. नागरिकांच्या मते कचरा उचलणाऱ्या गाड्या दोन-दोन दिवस येत नसल्याने नागरिकांची फसगत होत आहे.
घरात कचरा किती दिवस ठेवायचा, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. त्यामुळे नागरिक नाइलाजाने पूर्वी या ठिकाणी कचराकुंड्या होत्या. त्या ठिकाणी सर्रास कचरा टाकत आहेत. हा कचरा एवढ्या मोठ्या प्रमाणात साचत आहे की, काही वेळा हा कचरा त्याच ठिकाणी कुजत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे परिसरात डासांच्या प्रमाणात वाढ होत असून, अनेक साथीच्या आजारांना प्रोत्साहन मिळत आहे. सध्या परिसरात साथीच्या विविध आजारांनी नागरिक हैराण आहेत . पालिका रुग्णालयासह खासगी रुग्णालयात रुग्णांच्या रांगा दिसून येत आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाने परिसरातील ठिकठिकाणी साचलेला कचरा रोजच्या रोज वेळेवर उचलण्याची मागणी रहाटणी परिसरातील नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: HariNiakaran problem by harana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.