शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

देहूनगरीमध्ये हरिनामाचा गजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 01:33 IST

जगद्गुरू श्रीसंत तुकाराममहाराज ‘तुकाराम बीज’ वैकुंठगमन सोहळा २२ मार्चला आहे. या सोहळ्यासाठी भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असून, ठिकठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरू असल्याने संपूर्ण देहूनगरी हरिनामाच्या गजरात न्हाली आहे.

देहूगाव - जगद्गुरू श्रीसंत तुकाराममहाराज ‘तुकाराम बीज’ वैकुंठगमन सोहळा २२ मार्चला आहे. या सोहळ्यासाठी भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असून, ठिकठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरू असल्याने संपूर्ण देहूनगरी हरिनामाच्या गजरात न्हाली आहे.श्रीसंत तुकाराममहाराज संस्थान, पोलीस यंत्रणा व ग्रामपंचायत प्रशासन यंत्रणा भाविकांच्या सेवेसाठी आपआपल्या परीने कामाला लागली आहे. सध्या गावात धुराची फवारणी करण्यात येत आहे. आरोग्य पथकानेही त्यांचे काम सुरू केले आहे.पोलीस यंत्रणा कार्यान्वित झाली असून, उद्यापर्यंत पुरेसा बंदोबस्त दाखल होईल. वैकुंठगमन मंदिराच्या परिसरात गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी पंचवीस ते तीस फूट उंचीचा मनोराही उभारण्यात आला आहे. संस्थानच्या वतीने वैकुंठगमण मंदिराच्या समोर १०० फूट लांब व ७० फूट रुंद असा मंडप घालण्याचे काम सुरू आहे. ही धामधूम व सोहळ्याची तयारी सुरू असतानाच भाविकांना स्नानासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पाटबंधारे विभागाने इंद्रायणी नदीमध्ये पाणी सोडले असून, आज ते देहू येथे दाखल झाले आहे. बुधवारपर्यंत इंद्रायणी नदीच्या डोहात पुरेसा पाणीसाठा होण्याची शक्यता आहे.येथील जगद्गुरू श्रीसंत तुकाराममहाराज पालखी सोहळा दिंडी समाज धर्मशाळेत तुकाराम बीजेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह १७ मार्चपासून सुरू झाला आहे. या निमित्ताने नितीनमहाराज काकडे, उमेशमहाराज दशरथे, कान्होबामहाराज देहूकर यांची कीर्तन सेवा झाली आहे. तर अ‍ॅड. जयवंतमहाराज बोधले, महादेवमहाराज राऊत, संजयमहाराज पाचपोर, अनिलमहाराज पाटील, पंढरीनाथमहाराज तावरे व सुरेशमहाराज साठे यांची कीर्तन सेवा होणार आहे. २५ मार्चला रामरावमहाराज ढोक यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.शिवाय परिसरात इंद्रायणीकाठी, गाथामंदिर परिसर, विविध धर्मशाळांमध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सोहळ्याची सांगता बीजेच्या दिवशी काल्याच्या कीर्तन व महाप्रसादाने होणार आहे. गावात सध्या सर्वत्र हरिनामाचा गजर सुरू आहे. ठिकठिकाणी टाळमृदंगाच्या आवाजासह सूर ऐकू येत असल्याने सारा परिसर भक्तिमय झाला आहे.गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी मनोरावैकुंठगमन मंदिराच्या परिसरात गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी पंचवीस ते तीस फूट उंचीचा मनोराही उभारण्यात आला आहे. संस्थानच्या वतीने वैकुंठगमन मंदिराच्या समोर १०० फूट लांब व ७० फूट रुंद असा मंडप घालण्याचे काम सुरू आहे. बीज सोहळ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा रात्रदिवस काम करत आहे. तसेच देहूमध्ये हरिनामाचा जप सुरू आहे. त्यामुळे वातावरण भक्तीमय झाले आहे.नामसाधनेने अहंकार नष्ट होतो : नितीनमहाराज काकडेदेहूगाव : गाथा ही तुकोबारायांची मूर्ती आहे. संत तुकोबांच्या गाथेतील प्रत्येक अभंग मार्गदर्शक आहे. गाथेतील अनेक अभंगातून त्यांनी स्वत:चे गुण कमी मात्र दोष अधिक विशद केले आहेत. व्यवहार व परमार्थ वेगळा आहे, नामस्मरणाने काम, क्रोध दूर जातात. नामस्मरणाचे अनन्यसाधारण महत्त्व असून, नामस्मरणावर दृढविश्वास ठेवल्याशिवाय फळ मिळत नाही. नामसाधनेने अंहकार नष्ट होतो, असे प्रतिपादन कीर्तनकार हभप नितीनमहाराज काकडे यांनी श्रीक्षेत्र देहू येथे केले.संत तुकाराममहाराज बीजोत्सवानिमित्त जगद्गुरू श्रीसंत तुकाराममहाराज पालखी सोहळा दिंडी समाज यांच्या वतीने आनंदडोह रस्ता (श्रीक्षेत्र देहू) येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याच्या पहिल्या दिवशीच्या कीर्तनात काकडेमहाराज बोलत होते.‘बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल’ या संत तुकाराममहाराजांच्या अभंगावर निरूपण केले. गायनसाथ लक्ष्मणमहाराज चाळक, बंडोपत खामकर, खडूंमहाराज मोरे, मृदंग साथ रवींद्रमहाराज चव्हाण यांनी केली.दरम्यान रविवारी सकाळी वीणा, टाळ, कलश व मृदंग पूजन करून सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. या वेळी श्रीक्षेत्र भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, हभप पंढरीनाथ तावरे, रवींद्रमहाराज ढोरे, हभप विठ्ठल भालेकर, चिंतामण भालेकर, दत्तात्रय तरस, मधुकर बोडके आदी उपस्थित होते.सकाळी संतसेवा संघाचे अध्यक्ष हभप पंढरीनाथमहाराज तावरे यांच्या नेतृत्वाखाली गाथा पारायण सुरू झाले. हरिपाठ व कीर्तनसाथ पंचम वेद वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी, हभप भगवानमहाराज जाधव व हभप सुखदेवमहाराज तांबे यांचे शिष्यगण यांनी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड