मतदारांवर शुभेच्छांचा वर्षाव

By Admin | Updated: January 24, 2017 02:12 IST2017-01-24T02:12:14+5:302017-01-24T02:12:14+5:30

टाकवे बुदु्रक वडेश्वर जिल्हा परिषद गटामधून आणि टाकवे व वडेश्वर गणातून पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक

Happy voters | मतदारांवर शुभेच्छांचा वर्षाव

मतदारांवर शुभेच्छांचा वर्षाव

करंजगाव : टाकवे बुदु्रक वडेश्वर जिल्हा परिषद गटामधून आणि टाकवे व वडेश्वर गणातून पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची जोरदार तयारी केली आहे. गावागावांत, वाड्यावस्त्यांवर कोणत्या पक्षाची कोणाला उमेदवारी मिळणार याची जोरदार चर्चा आहे.
इच्छुकांकडून मतदारांपर्यंत पोहोाण्यासाठी दिवस-रात्र एक केली जात आहे. मावळ पंचायत समिती, जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. मतदारांवर दररोज शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्याकडून होत आहे.
विविध सुविचार, संदेश सोशल मीडियावरून पाठविले जात आहेत. आपल्या पक्षातून आपणास संधी मिळणार का या चिंतेत सध्या अनेक इच्छुक आहेत.
काही इच्छुकांनी उमेदवारीसाठी आपापल्या राजकीय पक्षाकडे फिल्डिंग लावली आहे. मात्र, काही जण स्वपक्षाची खात्री नसल्याने उमेदवारीसाठी इतर पक्षांकडेही चाचपणी करीत आहेत. काहींनी तर अपक्ष लढण्याचीही तयारी ठेवली आहे. (वार्ताहर)

Web Title: Happy voters