शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
3
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
4
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
5
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
6
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
7
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
8
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
9
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
10
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
11
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
12
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
13
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
14
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
15
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
16
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
17
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
18
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
19
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
20
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान

ईद मुबारक! राष्ट्रीय एकात्मता अन् बंधुत्वाची भावना वाढवावी; मौलानांचे आवाहन, पिंपरीत रमजान उत्साहात

By विश्वास मोरे | Published: April 11, 2024 4:03 PM

सर्वांवर प्रेम करा, सर्वांना आदर करण्यासाठी एकत्रित काम करण्याची प्रेरणा देण्याचा सण म्हणजेच रमजान ईद होय

पिंपरी : औद्योगिकनगरीतील ईदगाह मैदानावर गुरुवारी सकाळी मुस्लिम बांधवानी रमजान ईद निमित्त ईद-उल-फ़ित्र ही नमाज अदा केली. अल्लाजवळ सर्व नागरिकांच्या सुखसमृद्धि साठी दुवा केली. राष्ट्रीय एकात्मता व बंधुत्वाची भावना वाढवावी, असे मुफ्ती मौलानानी आवाहन केले.

पिंपरी-चिंचवड शहरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. भोसरी, घरकुल, निगडी, चिंचवड, आकुर्डी, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, पिंपरी, काळेवाडी, नेहरूनगर, कासारवाडी, दापोडी, जुनी सांगवी, पिंपळे गुरव, वाकड, रावेत परिसरात ईदची नमाज सकाळी ८ते १०  दरम्यान विविध मशिदीत, मदरचा ईदगाह मैदानात धर्मगुरू मुफ्ती, मौलाना, हाफीज साहब यांनी मुस्लिम बांधवांना नमाज पढविला.

यांनी नमाज पढविला!

चिंचवड परिसरात चिंचवडगाव-आलमगीर शाही मशीद, मौल्लाना मिनहाज असरफी, मौल्लाना इनामुल हक, चिंचवड स्टेशन-मजीद ए अम्मार-हाफीज मौन्नूद्दीन, मोहननगर-मजीद ए हिदायतूल मुस्लमीन-हाफिज वसीम साहब, विद्यानगर-मजीद ए अक्सा-मौल्लाना इम्रान मोन्नुद्दीन साहब, आकुर्डी-मजीद ए मदिना-मुफ्ती अबीद साहब, आकुर्डी-मजीद ए अक्सा-मुफ्ती अब्दुल कादीर साहब, काळभोरनगर-मजीद ए फारूकीया-हाफीज लायक साहब, बिजलीनगर-मजीद ए नूरईलाई-मौल्लाना अब्दुल सकूर साहब, वाल्हेकरवाडी-मजीद ए बीसाल-मौल्लाना खुर्शीद साहब, चिंचवडेनगर-मजीद ए हुसैनी-मौल्लाना आखीब साहब, दळवीनगर-मजीद ए बीसाल-हाफीज जैन्नूद्दीन साहब, चिंचवडगाव-मजीद ए ईदगाह-मौल्लाना मिनाज साहब यांनी नमाज पढविला.

एकमेकांना अलिंगन देत ईदच्या शुभेच्छा

अल्लाहाचा आज्ञेप्रमाणे शहरातील सर्व वयोगटातील मुस्लिम बांधव व महिलांनी ३० दिवसांचे उपवास त्यांच्या क्षमतेनुसार केले. दिवसभरात पाच वेळा नमाज पठण केले. दररोज संध्याकाळी रोजा इफ्तारी रोज (रोजा सोडण्याची) वेळ झाल्यानंतर सामुहीकरित्या करून तराबी नमाजमध्ये पवित्र कुराणचे पठण मुफ्ती मौल्लाना यांनी नमाज पढविला. चंद्रदर्शन झाल्यानंतर आज सकाळी मुस्लिम बांधव नवीन कपडे, पारंपारिक वेशभूषा परिधान करून रमजान ईदच्या नमाज पठण केले. विविध ठिकाणी नमाज पठण सामुहीकरित्या पार पडल्या, त्यावेळी धर्मगुरु मुफ्ती, मौल्लाना, हाफिज साहब यांनी अल्लाहाची शिकवण आहे. सर्वांवर प्रेम करा, सर्वांना आदर करण्यासाठी एकत्रित काम करण्याची प्रेरणा देण्याचा सण म्हणजेच रमजान ईद होय. ईदच्या नमाज पठणानंतर एकमेकांना अलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. कोणाचाही द्वेष करू नका, एकात्मता व बंधुत्वाची कास अंगीकारून एकत्रित आपली दिनचर्या पार पाडा. मुलांना शिक्षण देऊन त्यांना भावीकाळात आदर्श नागरिक कसे करता येईल. यासाठी आई-वडिलांनी प्रयत्नाची पराकाष्टा करावी. मुलांनी देखील आपल्या आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा संदेश यावेळी धर्मगुरू करवी देण्यात आला. तसेच, रमजान ईदमध्ये गरजूंना मदत करण्यासाठी जकात दिली जाते, दान केले जाते. प्रत्येक मुस्लिम बांधवांनी आपल्या उत्पन्नाचे २. ५ टक्के रक्कम, धान्य गरिबांसाठी दान केले पाहिजे, असा नियम असल्यामुळे अनेक बांधवांनी दिनदुबळ्या, सामाजिक आर्थिक उपेक्षितांना दान करून आपली जबाबदारी पार पाडून आज ईदच्या दिवशी शिरखुर्मा एकमेकांना घरी जाऊन त्याचा आस्वाद घेतला. अनेकांनी मोबाईलद्वारे ईदच्या शुभेच्छा दिल्या, सर्वठिकाणी ईद साजरी करण्यासाठी विविध मशीदीचे पदाधिकारी व मुस्लिम बांधवांनी परिश्रम घेतले. पोलीसांनी सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला.

टॅग्स :PuneपुणेRamzan Eidरमजान ईदSocialसामाजिकPoliceपोलिसMuslimमुस्लीम