शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

पाच लाख घरांवर हातोडा; न्यायालयाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 01:55 IST

राज्यभरातील बेकायदा व अनधिकृत बांधकामांना आता नियमबाह्य पद्धतीने नियमित करता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे

पिंपरी : राज्यभरातील बेकायदा व अनधिकृत बांधकामांना आता नियमबाह्य पद्धतीने नियमित करता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे पाच लाख अनधिकृत घरांवर हातोडा पडण्याची टांगती तलवार कायम आहे.पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न राज्यभर गाजला होता. शहरातील दोन प्रकरणे उच्च न्यायालयात दाखल झाली होती.त्यावेळी महापालिका क्षेत्रात ६५ हजार बांधकामे अनधिकृत आहेत, असे प्रतिज्ञापत्र महापालिकेने २००९ मध्ये न्यायालयात सादर केले होते. त्यानंतर बांधकामे पाडण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानंतर अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर झाली होती. या विषयावर महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही लढविण्यात आल्या होत्या. या प्रश्नाचे राजकारणही मोठ्या प्रमाणावर होऊन आमदारांनी राजीनामेही दिले होते.राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना त्यांनी सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. सत्तांतर झाल्यानंतर भाजपाने अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या संदर्भात मोठ्या प्रमाणावर श्रेयवादही झाला होता. महापालिकेच्या कागदोपत्री ६५ हजार बांधकामे आहेत, अशी माहिती आहे. प्रत्यक्षात ही बांधकामे पाच लाखांच्या वर आहेत. महापालिका, रेडझोन, प्राधिकरण, एमआयडीसी परिसरात अनधिकृत बांधकामे आहेत.बांधकाम तपासण्याची नाही यंत्रणाशहरात दोन मजल्यांच्या बांधकामांना परवानगी घेऊन चार मजले अनधिकृतपणे उभारले जातात. बिल्डरांकडून ग्राहकांची फसवणूक होते. मात्र, एमआरटीपी अ‍ॅक्टनुसार साईड मार्जिने सोडलेली बांधकामे दंड भरून नियमित करण्याची तरतूद आहे. मात्र, त्याविषयीची माहिती देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा महापालिकेत नाही. त्यामुळे ग्राहकांना बांधकाम व्यावसायिकांवर विसंबून राहावे लागते.सत्ताधाऱ्यांची वाढली अडचण ३१ डिसेंबर २०१७ पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारले होते. मात्र, उच्च न्यायालयाने बेकायदा बांधकामांना संरक्षण देण्यासाठी एमआरटीपी कायद्यात दुरुस्ती करून नव्याने समाविष्ट करण्यात आलेले कलम घटनाबाह्य ठरवले आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे काय होणार, असा प्रश्न आहे. सरकारची अडचण वाढली आहे.शासनाची स्थगिती फेटाळलीराज्यभरातील बेकायदा बांधकामांना संरक्षण देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. राज्यभरातील बेकायदा बांधकाम आता नियमबाह्य पद्धतीने नियमित करता येणार नाहीत, असे उच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. निर्णयाला स्थगिती देण्याची राज्य सरकारची विनंती उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड