ऐन निवडणुकीत हातोडा

By Admin | Updated: January 25, 2017 02:08 IST2017-01-25T02:08:19+5:302017-01-25T02:08:19+5:30

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने थेरगाव येथील धनगरबाबा मंदिराच्या शेजारील जय शंकर फर्निचरच्या

A hammer in the elections | ऐन निवडणुकीत हातोडा

ऐन निवडणुकीत हातोडा

रहाटणी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने थेरगाव येथील धनगरबाबा मंदिराच्या शेजारील जय शंकर फर्निचरच्या अनधिकृत तीन मजली इमारतीवर सकाळी साडेदहाच्या सुमारास कारवाई करण्यात आली. ही कारवाई सुमारे तीन तास सुरू होती. ऐन निवडणुकीच्या काळात अचानक प्राधिकरणाची कारवाई सुरू झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण होते.
अगदी सकाळीच दुकान उघडण्याच्या सुमारास प्राधिकरणाचे अतिक्रमणविरोधी पथक इमारतीच्या दारात पोलीस बंदोबस्तात उभे होते. दुकानातील सामान काढण्यासही त्या दुकानदारास वेळ देण्यात आला नाही. मात्र या पाडापाडीत दुकानातील सामानाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात आली. अगदी सुरुवातीला दुकानाचा दर्शनी भाग पाडण्यात आला. त्यानंतर पहिल्या मजल्यावरील पत्राशेड पाडण्यात आली व तिसऱ्या मजल्यावरील भिंती मजुरांच्या साह्याने पाडण्यात आल्या. ही कारवाई थांबविण्यासाठी दुकानदार अतोनात प्रयत्न करीत होते. मात्र, अधिकारी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. मात्र त्यांनी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याच्या सूचना करताच दुकानदारांनी थेट प्राधिकरणाचे कार्यालय गाठले. काही काळापुरती कारवाई थांबविण्यात आली.

Web Title: A hammer in the elections