पोलिसांनी उधळली गुंडांच्या वाढदिवसाची पार्टी

By Admin | Updated: March 16, 2017 23:46 IST2017-03-16T23:46:18+5:302017-03-16T23:46:18+5:30

कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या वाढदिवसाच्या पार्टीचे हिंजवडीतील एका हॉटेलात आयोजन केले होते. लहान मुलाचा वाढदिवस आहे

Gunda's birthday party was foiled by police | पोलिसांनी उधळली गुंडांच्या वाढदिवसाची पार्टी

पोलिसांनी उधळली गुंडांच्या वाढदिवसाची पार्टी

>ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 16 - कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या वाढदिवसाच्या पार्टीचे हिंजवडीतील एका हॉटेलात आयोजन केले होते. लहान मुलाचा वाढदिवस आहे, असे खोटे कारण सांगून घायवळच्या मित्रपरिवाराने हॉटेलचे बुकींग केले होते. व्हॉटसअ‍ॅपवर निमंत्रण पत्रिका पाठविल्याने त्यांच्या संपर्कातील अनेक तरूण सायंकाळी हॉटेलमध्ये मोठ्या संख्येने जमा झाले. कसलीही परवानगी न घेता आयोजित केलेली पार्टी हिंजवडी, वाकड पोलिसांनी उधळून लावली.
 
हिंजवडीतील एका हॉटेलच्या लॉनवर ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. वाढदिवसाच्या पार्टीसाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. मोटारींमध्ये मद्याचा साठा आणला होता.हॉटेलच्या लॉनवर रोषणाई करून डीजे लावण्याची तयारी सुरू होती. व्हॉटसअ‍ॅपवरील निमंत्रण पत्रिकेत सायकांळी ६ ची वेळ दिली होती. मात्र ही पार्टी रात्री उशीरापर्यंत सुरू राहणार होती. गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित अनेकजण या पार्टीसाठी आवर्जून आले होते. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे त्यांना लगेच गाशा गुंडाळावा लागला. वाढदिवसाच्या पार्टीसाठी जमा झालेले तरूण काही वेळातच तेथून पसार झाले. 

Web Title: Gunda's birthday party was foiled by police