शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

गुंड काळभोरसह साथीदारांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 04:05 IST

रावण टोळीचा प्रमुख अनिकेत जाधव याच्या खुनातील मुख्य आरोपी सोन्या काळभोरसह अन्य चार फरारी आरोपींनाही निगडी पोलिसांनी रविवारी रात्री मळवली येथून अटक केली.

पिंपरी : रावण टोळीचा प्रमुख अनिकेत जाधव याच्या खुनातील मुख्य आरोपी सोन्या काळभोरसह अन्य चार फरारी आरोपींनाही निगडी पोलिसांनी रविवारी रात्री मळवली येथून अटक केली. सोमवारी मोरवाडी न्यायालयात हजर केले असता, २ डिसेंबरपर्यंत न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित चार आरोपींना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे.रावण टोळीचा प्रमुख अनिकेत जाधव याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सोन्या काळभोर, अक्षय काळभोर (दोघे रा. पंचतारानगर, आकुर्डी), दत्ता काळभोर (रा. समर्थनगरी, निगडी), जीवन सातपुते, बाबा ऊर्फ अमित फ्रान्सिस (दोघे रा. भोसरी) यांना रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी महाकाली टोळीचा प्रमुख व अनिकेत खूनप्रकरणी सहभाग असलेला हनम्या शिंदे, तेजस प्रदीप मांडलिक (वय २१ रा. दत्तवाडी, आकुर्डी), अक्षय सुरेश नेहरे (वय २१, रा. आकुर्डी), वासुदेव ऊर्फ संतोष हिरामण जोशी (वय २५, रा. आकुर्डी) यांना यापूर्वीच अटक केली आहे. अनिकेत खून प्रकरणातील एकूण ९ आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे, अशी माहिती पोलीस अधिकारी शंकर आवताडे यांनी दिली.रावण टोळीचा प्रमुख अनिकेत जाधव याचा २० नोव्हेंबरला रात्री आकुर्डी येथील शितळादेवी मंदिराजवळ खून करण्यात आला. तलवारीने वार करून, तसेच डोक्यात दगड घालून अनिकेतचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या खुनाचा बदला घेण्यासाठी अनिकेतने तयार केलेल्या रावण टोळीतील दोन जणांनी रविवारी रात्री सोन्या काळभोर याच्यावर गोळीबार केला. त्यात सोन्या काळभोरने गोळी चुकवली, मात्र त्याचे दोन साथीदार जखमी झाले, अशी चर्चा शहरात होती. मात्र, फरार गुंड सोन्या काळभोर हा मावळ परिसरात असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यांनी तपास पथकाच्या मदतीने सोन्यासह त्याच्या चार साथीदारांना पकडले.

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे