पिंपरीत पशुसंवर्धनाविषयी मार्गदर्शन
By Admin | Updated: July 12, 2016 01:31 IST2016-07-12T01:31:40+5:302016-07-12T01:31:40+5:30
महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत पशुसंवर्धनाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्राण्यांना मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.

पिंपरीत पशुसंवर्धनाविषयी मार्गदर्शन
पिंपरी : महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत पशुसंवर्धनाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्राण्यांना मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.
प्राण्यांपासून माणसांना होणाऱ्या किंवा प्राण्यांमुळे माणसाला प्रादुर्भाव होणाऱ्या संसर्गजन्य रोगांना ‘झूनोटिक डिसिझेस’ असे संबोधतात. अशा प्राणिजन्य रोगांपासून मानवी संरक्षण व्हावे, या उद्देशाने ‘झुनोसिस दिन’ पाळला जातो.
प्राणी हाताळणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना या दिवसाचे औचित्य साधून रेबीज, धनुर्वात प्रतिबंधात्मक लसीकरण व आवश्यक उपाययोजना करणेत आल्या. निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनाही यामध्ये समावेश होता. महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन खात्याचे सहायक आयुक्त प्रमोद वराडे यांनी विषयासंदर्भात व्याख्यान दिले. सापांचे विविध प्रकार, सर्पदंशाबाबतची माहिती आणि तातडीक उपाययोजना याबाबत माहिती देण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांचे शंका निरसन डॉ. वरहाडे यांनी केले. या वेळी महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन खात्याचे डॉ.एच.एन.पाटील, महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीेने शहरातील पाळीव कुत्र्यांना व मांजरांना पिंपरी व निगडी-प्राधिकरण येथील प्राण्याचे दवाखान्याच्या ठिकाणी मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. या शिबिर कालावधीमध्ये एकूण ५५० पेक्षा जास्त प्राण्यांना लसीकरण करण्यात आले, असे डॉ. गोरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)