शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी शहरातील पूरपरिस्थितीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 16:19 IST

पाऊस थांबल्यानंतर तातडीने मुळानदीच्या काठी सीमाभिंत बांधण्याचे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

ठळक मुद्देभाजपाच्या नगरसेवकांच्या परिसराला पालकमंत्र्यांची भेट

पिंपरी :  शहरातील पूरपरिस्थितीचा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  मंगळवारी धावता आढावा घेतला. पिंपळेनिलख येथील शाळेत स्थलांतरित केलेल्या नागरिकांची भेट घेतली. वाकड, कस्पटेवस्ती, पिंपळेनिलख परिसराची पाहणी केली. पाऊस थांबल्यानंतर तातडीने मुळानदीच्या काठी सीमाभिंत बांधण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे, महापौर राहुल जाधव, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक तुषार कामठे, संदिप कस्पटे, आरती चौंधे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड उपस्थित होते.  यावेळी तुषार कामठे आणि कस्पटे यांनी पुर परिस्थितीची व मदतकार्याची माहिती दिली. तसेच मुळा नदीचे खोलीकरण करुन सिमाभिंत बांधण्याची मागणी केली. त्यावर पालकमंत्री पाटील यांनी मुळानदीच्या बाजूला सीमा भिंत बांधणे आवश्यक आहे. पाऊस थांबल्यानंतर तातडीने सीमाभिंत बांधण्याचे काम हाती घेण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना दिले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे काम करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली.  पावसाचा जोर ओसरला.  गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धैमान घातल्याने नदीला महापूर आला होता. नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. रुग्णालयामध्ये देखील पाणी शिरले आहे. नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जनजीवन विस्कळीत झाले होते. महापालिकेने दोन दिवसांत बोपखेल, दापोडी, पवारवस्ती, चिंचवड, पिंपळेगुरव या परिसरातील सात हजार लोकांचे महापालिकेच्या शाळांमध्ये स्थलांतरण केले आहे. आज पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला आहे. त्यामुळे पाण्याची पातळी कमी आली आहे.

भाजपाच्या नगरसेवकांच्या परिसराला पालकमंत्र्यांची भेटपालकमंत्री पाटील यांच्या दौऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. नगरसेवक मयूर कलाटे म्हणाले,  भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक असणाऱ्या भागातच पालकमंत्री पाहणीसाठी गेले होते. वाकड परिसरातील पूरग्रस्तांना त्यांनी भेट देणे अपेक्षित होते. मात्र, पूरग्रस्तांचे प्रश्न जाणून घेण्यातही पालकमंत्र्यांनी राजकारण केले. वाकड परिसरातीही पावसाने मोठे नुकसान झाले आहे. कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडchandrakant patilचंद्रकांत पाटीलRainपाऊसfloodपूर