राजर्षी शाहूमहाराज यांना अभिवादन

By Admin | Updated: June 27, 2017 07:16 IST2017-06-27T07:16:32+5:302017-06-27T07:16:32+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहूमहाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय

Greetings to Rajarshi Shahu Maharaj | राजर्षी शाहूमहाराज यांना अभिवादन

राजर्षी शाहूमहाराज यांना अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहूमहाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस तसेच चिंचवड येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत व चिंचवड येथील राजर्षी छत्रपती शाहूमहाराज पुतळा चौकात झालेल्या या कार्यक्रमास विरोधी पक्षनेते योगेश बहल, अपक्ष आघाडी गटनेते कैलास उर्फ बाबा बारणे, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, मंगला कदम, शर्मिला बाबर, नगरसदस्य केशव घोळवे, तुषार हिंगे, राजेंद्र लांडगे, माजी नगरसदस्य उत्तम हिरवे, बाबा बागल, चंद्रकांता सोनकांबळे, सह आयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, रेखा गाडेकर, कार्यकारी अभियंता संजय कांबळे, प्रशासन अधिकारी रामकिसन लटपटे, मानव कांबळे, सुरेश कसबे, बाळासाहेब भागवत, नामदेव शिंत्रे, पी. बी. पाटील, आनंदराव पाटील, मनोहर चौगुले, पी. वाय. पाटील, मिलिंद वेल्हाळ, महादेव बुजरे, वसंत पाटील, अनिल पाटील, रमेश चिमुरकर, लिंबराज कांबळे, के. एम. भुख्तर, गणेश क्षीरसागर, संतोष जोगदंड, रमेश भोसले, किशोर केदारी, प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
आरपीआयकडून अभिवादन -
निगडी : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)च्या वतीने राजर्षी शाहूमहाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
शहराध्यक्ष सुधाकर वारभुवन यांनी पुष्पहार अर्पण केला.
या वेळी महाराष्ट्र सचिव बाळासाहेब भागवत, सम्राट जकाते, भरत खरात, दत्ता ठाणांबिर, योगेश गायकवाड, राघू बनसोडे, शुभम भागवत व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Greetings to Rajarshi Shahu Maharaj