गीतातून केले शहीद जवानांना अभिवादन
By Admin | Updated: January 26, 2017 00:12 IST2017-01-26T00:12:11+5:302017-01-26T00:12:11+5:30
पिंपरी-चिंचवड कलाकार संघ, पुणे यांच्या वतीने आचार्य अत्रे रंगमंदिरात ‘आय लव्ह माय इंडिया’ या देशभक्ती व सामाजिक संदेश गीतांचा कार्यक्रम झाला.

गीतातून केले शहीद जवानांना अभिवादन
पिंपरी : पिंपरी-चिंचवड कलाकार संघ, पुणे यांच्या वतीने आचार्य अत्रे रंगमंदिरात ‘आय लव्ह माय इंडिया’ या देशभक्ती व सामाजिक संदेश गीतांचा कार्यक्रम झाला.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस ‘मातृभूमी रक्षणार्थ शहीद जवान, स्वातंत्र्य सैनिक, हुतात्मा पोलीस कर्मचारी, सर्व महामाता व महापुरुष, तसेच भारतीय संविधान शिल्पकार विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन, तसेच देशाच्या नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम तसेच समता व बंधुभावाची प्रेरणा निर्माण करण्याच्या उद्देशाने या प्रबोधनात्मक, जोशिल्या कार्यक्रमाचे विनामूल्य सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमात ‘जहाँ डाल डाल पर, ऐ मालिक तेरे बंदे हम, ए वतन ए वतन, है प्रीत जहाँ की रीत सदा, नन्हा मुन्ना राही हूँ, मेरे देश की धरती, जिंदगी मौत ना बन जाए, वतन पे जो फिदा होगा, संदेसे आते हैं, देस मेरा रंगिला, शूर आम्ही सरदार, म्यानातून उसळे, मेरा रंग दे बसंती चोला, आय लव्ह माय इंडिया, इतनी शक्ती हमें देना दाता, ए मेरे वतन के लोगो, माझ्या भीमरायावानी असा पुढारी होईल का?, वंदे मातरम, मिले सूर मेरा तुम्हारा, जन गण मन’ इत्यादी गीते कलाकारांनी सादर केली.
मयुरेश वाघ, स्वप्नील पवार, नितीन कदम, महेंद्र अडसूळ, रविंद्र कांबळे, मोहम्मद रफी शेख, पी. चंद्रा, संपदा गुरव, श्रृती शशिधरन, गीतांजली केळकर. पृथ्वीराज इंगहे तर मानसी, रेणू, सतीश सेन, केवीन रुब्दी, संतोष पवार, शाम चंदनशिव, राजेश डेव्हीड यांनी गायन केले. जिप्सन सोळंकी, विजय उलपे यांनी निवेदन केले.
कार्यक्रमासाठी कमलाकर सकट, मनीष रुब्दी, कृष्णा वाघ, धिवार बाबा, संदीप बोरसे, राजेश डेव्हिड, श्याम चंदनशिव, रवींद्र कांबळे, पी. चंद्रा, विजय उलपे, तसेच
संस्थेचे पदाधिकारी, यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)