शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

दापोडी ते निगडी बीआरटीला ग्रीन सिग्नल; आयआयटी पवईने केलेल्या अहवालातील सूचनांची अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 03:40 IST

गेल्या १० वर्षांपासून रखडलेला दापोडी ते निगडी या बीआरटी मार्गाच्या सुरक्षिततेबाबत आयआयटी पवईने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. याबाबतचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केल्यानंतर या मार्गास हिरवा कंदील मिळणार आहे.

पिंपरी : गेल्या १० वर्षांपासून रखडलेला दापोडी ते निगडी या बीआरटी मार्गाच्या सुरक्षिततेबाबत आयआयटी पवईने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. याबाबतचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केल्यानंतर या मार्गास हिरवा कंदील मिळणार आहे. महिनाभरात हा मार्ग सुरू होण्याची शक्यता महापालिका प्रशासनाने व्यक्त केली.पिंपरी-चिंचवड महापालिकेचा जेएनएनयूआरएम योजनेत समावेश झाल्यानंतर सार्वजनिक वाहतूक सेवेचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने बीआरटी मार्ग उभारण्याची योजना आखली. सुरुवातीला पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते भक्ती-शक्ती चौक असे नियोजन केले. कामेही सुरू झाली.मार्गिका उभारण्यात आल्या. बसस्टॉपची कामे झाली. या एकाच मार्गावर ग्रेड सेपरेटर, बीआरटी आणि सामान्यांसाठी स्वतंत्र लेन अशा एकूण तीन प्रकारची वाहतूक व्यवस्था असल्याने बीआरटी यशस्वी होणार नाही, असा सूर आळविण्यात आला. या संदर्भात न्यायालयात याचिकाही दाखल झाली.दरम्यान, लेन तयार करूनही वापर होत नसल्याने त्या वेळी काँग्रेसने लेन इतर वाहतुकीसाठी खुल्या केल्या होत्या. तसेच तत्कालीन सदस्या सीमासावळे आणि आशा शेडगे यांनी विरोध केला होता. याचिकेवरील सुनावणीत सेफ्टी आॅडिटकरूनच मार्ग सुरू करावा,तोपर्यंत न्यायालयाने या मार्गास ‘जैसे थे’ आदेश दिला होता. त्यानंतर गेले १० वर्षे या मार्गाचे काम थांबले होते.महापालिकेत सत्तांतर झाले. भाजपाची सत्ता आली. श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेचे आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी सार्वजनिक वाहतूक स्मार्ट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. तसेच सत्ता येताच आमदार लक्ष्मण जगताप यांनी हा मार्ग केव्हाही सुरू करा; परंतु तोपर्यंत या मार्गिकेतून इतर वाहने सोडा, अशी मागणी केली होती. त्यानुसार हा मार्ग खुला केला होता. सुरुवातीला भाजपाचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी बीआरटीवरील उधळपट्टीच्या चौकशीची मागणी केली होती.प्रशासनाच्या वतीने उपाययोजना केल्यानंतर स्थायी समिती सभापतींनी बीआरटीस विरोध दर्शविला आहे. दोनशे कोटींचा निधी परत गेला तरी चालेल. कोणाही निरपराध्याचा जीव जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.सुरक्षेच्या उपाययोजना१सह शहर अभियंता राजन पाटील म्हणाले, ‘‘आयआयटी पवईने केलेल्या सूचनांचा अहवाल २ फेब्रुवारीला मिळाला. त्यानुसार ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या चार दिवसांत उर्वरित काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर कामापूर्वीची स्थिती आणि सूचनांनंतरची स्थिती असा अहवाल पाठविण्यात येणार आहे. तसेच न्यायालयातही याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर सर्व पदाधिकाºयांनाही सुरक्षिततेची माहिती दिली जाणार आहे. सोईस्कर वेळेनुसार हा मार्ग नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे. सर्वसाधारणपणे १५ दिवसांचा कालावधी यासाठी अपेक्षित आहे.’’आयआयटी करणार तीन वर्षे पाहणी२आयआटी पवईने पुढील तीन वर्षांसाठी सेवादेण्याची तयारी दर्शविली आहे. दर सहा महिन्यांनी त्यांचे पथक पाहणी करणार आहे. निरीक्षण नोंदवून अहवाल देणार आहे. या संदर्भातील विषय स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. या मार्गासाठी २०० पीएमपी बस सज्ज आहेत. त्यांना आरएफआयडी आणि जीपीएस बसविण्यात आले आहेत.आयआयटीच्या अहवालातील सूचना३स्पीड ब्रेकरवरील गेलेले पट्ट पुन्हा मारावेत. चौक ते बस स्टॉपपर्यंत जाणाºया पादचारी मार्गावर साईन असावेत. मार्गिकेवरील तुटलेल्या वाकलेल्या लेन सरळ कराव्यात. रेलिंग व्यवस्थित आहे किंवा नाही, याची पाहणी करावी.आयआयटी पवईच्या अहवालानुसार सुरक्षेच्या उपाययोजना करूनच बीआरटी सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. या मार्गिकेवर प्रवासी सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. आम्ही पाहणी केली होती. त्या वेळी प्रशासनास काही सूचना केल्या. त्यांची अंमलबजावणी करून या संदर्भातील म्हणणे न्यायालयात मांडण्यात येणार आहेत. न्यायालयाच्या परवानगीनंतरच हा मार्ग सुरू करण्यात येणार आहे.- एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेते

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड