खराबवाडी येथील ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपात प्रवेश

By Admin | Updated: January 16, 2017 23:42 IST2017-01-16T23:42:55+5:302017-01-16T23:42:55+5:30

खराबवाडी येथील ग्रामपंचायत सदस्यांनी उद्योगपती व ग्रामपंचायत सदस्य जीवनशेठ खराबी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत

Gram Panchayat members in Patwariwadi enter BJP | खराबवाडी येथील ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपात प्रवेश

खराबवाडी येथील ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपात प्रवेश

>ऑनलाइन लोकमत
चाकण,दि.16 - खराबवाडी येथील ग्रामपंचायत सदस्यांनी उद्योगपती व ग्रामपंचायत सदस्य जीवनशेठ खराबी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.
 
खराबवाडीचे ग्रामपंचायत सदस्य व उद्योगपती मल्हारीशेठ केसवड, मनोहरशेठ खराबी, प्रीतमशेठ कड, नवनाथशेठ शेडगे, अनंतकृपा पतसंस्थेचे संचालक भरतशेठ बिरदवडे आदींनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी भाजपा शिरूर लोकसभा संपर्कप्रमुख संदीप सोमवंशी, भाजपा युवा मोर्चा दक्षिण मुंबई अध्यक्ष  जाधव व उद्योजक काळुराम पिंजण आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जीवनशेठ खराबी यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांना पक्षात योग्य व सन्मानाची वागणूक मिळेल व विकासकामांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले. उद्योगपती जीवनशेठ खराबी यांच्या सामाजिक कार्याचे व कामांचे कौतुक यावेळी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांनी केले तसेच आगामी काळात ग्रामपंचायत सदस्य जीवनशेठ खराबी यांना पक्ष संघटनेत महत्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिली जाईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिला.
 
तसेच भाजपात प्रवेश केलेले जीवनशेठ खराबी यांनी आम्ही सर्वजण संघटनात्मक कामे करून आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर कमळ फुलवणार, असे आश्वासन यावेळी बोलताना दिले. खराबवाडी ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रवेशाने खराबवाडी नव्हे तर आगामी होणाऱ्या महाळुंगे पंचायत समिती गण, जिल्हा परिषद गटात व खेड तालुक्याच्या दक्षिण पट्यात भाजपाची ताकद वाढली आहे व यामुळे भाजपा कार्यकर्त्यांन मध्ये निश्चितच उत्साहाचे वातावरण झाले आहे.

Web Title: Gram Panchayat members in Patwariwadi enter BJP