ग्रामपंचायत निवडणुका होणार चार आॅगस्टला

By Admin | Updated: July 11, 2015 04:48 IST2015-07-11T04:48:41+5:302015-07-11T04:48:41+5:30

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मावळ तालुक्यातील आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१५ कालावधीत मुदत संपणाऱ्या ५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका

Gram Panchayat elections will be held on August 4 | ग्रामपंचायत निवडणुका होणार चार आॅगस्टला

ग्रामपंचायत निवडणुका होणार चार आॅगस्टला

वडगाव मावळ : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मावळ तालुक्यातील आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१५ कालावधीत मुदत संपणाऱ्या ५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका व १५ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचे दि. ४ आॅगस्ट रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्र सोमवारी (दि. १३) ते सोमवारी (दि. २०) जुलै सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत तहसील महसूल भवन येथे दाखल करण्यात येतील, अशी माहिती तहसीलदार शरद पाटील यांनी दिली.
मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे, माळेगाव बुद्रुक, खांड, कशाळ, डाहुली, वडेश्वर, वेहेरगाव, ताजे, मळवली, कार्ला, खांडशी, पाटण, उकसान, शिरदे, आपटी, तिकोणा, कोथुर्णे, वारू, मळवंडी
ठुले, अजिवली, मोरवे, महागाव, येलघोल, बऊर, पाचाणे, कुसगाव (पवन मावळ), येळसे, शिवली, थुगाव, शिवणे, आढले खुर्द, करंजगाव,
साई, चिखलसे, टाकवे बुद्रुक, घोणशेत, खडकाळा, साते, कुसगाव खुर्द, नाणे, आढे, सोमाटणे, परंदवडी,
दारुंब्रे, धामणे, उर्से, गहुंजे, सांगवडे, आंबी, कुरवंडे व कुसगाव बुद्रुक
या ५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका व सावळा, भोयरे,
गोडुंब्रे, इंदोरी, उधेवाडी, बेबेडोहोळ, लोहगाव , भाजे, दिवड, नाणोली तर्फे चाकण, पुसाणे, टाकवे खुर्द, कान्हे, कुणे नामा व औंढे खुर्द या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होणार आहेत.
एकूण ३७ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले असून, ७ निवडणूक निर्णय अधिकारी राखीव आहेत. (वार्ताहर)

Web Title: Gram Panchayat elections will be held on August 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.