शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकऱ्यांच्या बांधावरील माल थेट 'आयटीयन्स' च्या हातात; वाकडमधील 'पलाश' सोसायटीचा आदर्श उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 16:28 IST

शंभरहून अधिक पुरवठादार तर दोनशेहुन अधिक सोसायट्या सहभागी..

ठळक मुद्देएकही कामगार सुट्टीवर नसलेली सोसायटी... विविध सेवा-सुविधा घरबसल्या एका क्लिकवर उपलब्ध

बेलाजी पात्रे- वाकड : कोरोनामुळे संचारबंदी जाहीर असताना देखील सकाळी सकाळी हातात पिशवी घेऊन भाजीपाला, किराणा व इतर गोष्टी आणण्यासाठी तसेच मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणारे नागरिक निदर्शनास येत आहे. याचवेळी ते सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवतातच पण इतरांच्या जीवाला धोका देखील निर्माण करतात. मात्र, वाकडमधील पलाश सोसायटीने अशा लोकांसमोर एक अनोखा आदर्श उभा केला आहे. त्यांनी वेबसाईटच्या माध्यमातून ग्राहक व विक्रेते यांचे जाळे तयार करुन शेतकयांच्या बांधावरील ताजा शेतमाल थेट ‘आयटीयन्स’च्या हातात पडत आहे, यासह विविध सेवा-सुविधा घरबसल्या एका क्लिकवर उपलब्ध झाल्या आहेत.

 पिंपरी चिंचवडमध्ये इको-फ्रेंडली हाऊसिंग सोसायटी अशी ओळख असलेल्या या सोसायटीने सर्वांनी सुरक्षित घरीच राहावे यासाठी सहकार खाते, महाराष्ट्र विकास पणन मंडळ व स्थानिक पोलीस यांच्या विशेष मदतीने शेतकरी ते थेट ग्राहक या शासनाच्या योजनेला मूर्त रूप देत, लॉकडाऊन व कोरोनावर मात करणारा आगळा वेगळा प्रेरणादायी पलाश मॉडेल साकारला आहे. किरण वडगामा, युवराज हुगे, राहुल करंगळे यांनी व्हाट्स अप ग्रुपवर सुरू केलेल्या या संकल्पनेला प्रचंड प्रतिसाद लाभला आणि मग सर्वांची मोट बांधून वेबसाईटची निर्मिती केली. या वेबसाईटद्वारे आवश्यक गरजेचा स्त्रोत मिळाला, बहुतेक वस्तू दाराजवळ वितरित होत असल्याने त्या दूषित होण्याचा धोकाही कमी आहे तसेच विक्रेत्यांचा तपशील माहित असल्याने कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्यांचा शोध घेणे सहज शक्य आहे. भाजीपाला, फळे, किराणा सामान, दूध, औषधे, डॉक्टर, लॅब, इलेक्ट्रिशियन, गॅरेज मेकॅनिक, बेकरी, डायग्निस्टिक सेंटर, फळे, डेअरी प्रॉडक्ट्स, वाहनांच्या बॅटरी इत्यादी सर्व सुविधा घेता येतात.

 लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. उद्योग, धंदे, व्यवसाय बंद आहेत सर्व आर्थिक घडी विस्कटली असताना या काळात रहिवाशांचे सामान्य जीवन कसे नियमित ठेवता येईल याचा उत्तम नमुना म्हणजे पलाश सोसायटी होय. पलाश गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष किरण वडगामा यांच्या नेतृत्वात येथे ७ इमारतींमध्ये २९५ फ्लॅट्स आहेत. 

एकही कामगार सुट्टीवर नसलेली सोसायटी...

लॉकडाऊन सुरू होताच अनेकांनी गावे गाठली. मात्र, पलाश सोसायटीने एकाही सुरक्षारक्षक, स्वच्छता कामगाराला सुट्टी दिली नाही त्यांनी सर्वात आधी कामगारांची काळजी घेत त्यांना चांगल्या प्रतीचे मास्क, सॅनिटायझर दिले.

वाकड व परिसरात गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांनी व विना अडथळा, विना अडत, विना हमाली शेतकऱ्यांच्या वस्तू थेट ग्राहकांना मिळण्यासाठी ग्लोबल सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यास आम्ही पणन महामंडळाकडुन सर्व तोपरी कायदेशीर सहकार्य करीत आहोत. अशा उपक्रमामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही तर कोरणावरही मात करता येणार आहे. - शाहूराज हिरे (उपनिबंधक, सहकारक खाते)

टॅग्स :wakadवाकडvegetableभाज्याfruitsफळेbusinessव्यवसाय