शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक निकाल! पाकिस्ताननंतर आणखी एक तगडा संघ हरला, कॅनडाने विजय मिळवला 
2
...तर महाविकास आघाडी विधानसभेत स्पष्ट बहुमतानं जिंकेल; योगेंद्र यादवांची भविष्यवाणी
3
नरेंद्र मोदींच्या हातातील राष्ट्रपतींनी दिलेल्या या पत्रात नेमकं काय?; जाणून घ्या
4
फडणवीस पायउतार होताच गिरीश महाजन नवे उपमुख्यमंत्री? चर्चेला उधाण येताच म्हणाले... 
5
आम्ही सोबत नसतो तर काँग्रेसनं इतक्या जागा जिंकल्या असत्या का?; संजय राऊतांचा प्रश्न
6
T20WC सुरू असताना ऋतुराज गायकवाडचा Video Viral; अचंबित करणारं घडलं काहीतरी
7
इस्रायलचा मध्य गाझामध्ये हवाईहल्ला; ४० पॅलेस्टाइन नागरिक ठार, १८ लहान मुलांचा समावेश
8
विधानसभा मनसे स्वबळावर लढणार?; राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर नेते म्हणाले...
9
हुथी बंडखोरांची मुजोरी! सागरी हल्ल्यानंतर आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या ९ कर्मचाऱ्यांना बनवले बंदी
10
मोठी बातमी: महाराष्ट्रात हादरा, दिल्लीत बैठक; शिंदे-फडणवीस-अजितदादांमध्ये खलबतं सुरू
11
शरद पवारांच्या पक्षातील ३ आमदार आमच्यासोबत येणार; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा
12
शेअर बाजार घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी 'त्या' दिवशी बक्कळ कमाई केली; पाहा...
13
मोदींसोबत वाजपेयींसारखा गेम करू शकतात चंद्राबाबू नायडू?; भाजपा उचलतंय सावध पाऊल
14
ईव्हीएम जिवंत आहे का? म्हणणाऱ्या मोदींना काँग्रेसचे प्रत्युत्तर; म्हणाले, "पुरावे घेऊन तुमच्याकडे..."
15
अजित पवारांनंतर प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; ईडीने परत केली १८० कोटींची संपत्ती
16
शेअर मार्केटने मोडला 3 जूनचा रेकॉर्ड; सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाढ, Sensex 76000 पार...
17
जितते कम है, हारते जादा...! पाकिस्तानच्या पराभवानंतर बिचाऱ्या या तरुणीची व्यथा ऐका, Video 
18
लोकसभेतल्या विजयानंतर शिंदेंच्या मतदारसंघावर राणेंचा दावा; उदय सामंत म्हणाले, "फडणवीसांकडे..."
19
याला म्हणतात 'खटा-खट खटा-खट रिटर्न'! 4 वर्षांत ₹1 लाखाचे झाले ₹47 लाख; दिला 4500% चा बंपर परतावा
20
...आणि तू विराट कोहलीशी स्पर्धा करतोस! IShowSpeed ने पाकिस्तानी संघाची पार लाज काढली

पिंपरीच्या मोबाइल मार्केटमध्ये गोलमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 2:43 AM

अ‍ॅक्सेसरीजमध्ये ग्राहकांची फसवणूक; जीएसटी बिलाशिवाय राजरोस होतेय विक्री

- प्रकाश गायकर पिंपरी : मोबाइल ही जीवनावश्यक बाब बनली आहे. मोबाइल घ्यायचा असो किंवा चार्जर; आठवण होते ती पिंपरीतील मोबाइल मार्केटची. कोणत्याही कंपनीचा मोबाइल व अ‍ॅक्सेसरीज मिळण्याचे शहरातले एकमेव हक्काचे ठिकाण म्हणजे पिंपरी मार्केट. परंतु या मार्केटमध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याचे धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ प्रतिनिधीने उजेडात आणला आहे.मोबाइल किंवा मोबाइलशी निगडित इतर साहित्य घेण्यासाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर येथे गर्दी असते. महागडे मोबाइल, तसेच मोबाइलची बॅटरी, हेडफोन, चार्जर, ब्ल्यू टूथ हेडफोन येथे मिळतात. मात्र सामान्य ग्राहकांची दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात लूट केली जाते. मोबाइलचे साहित्य विकून किमतीमध्ये व वॉरंटीमध्ये फिरवाफिरवी केली जाते. ठरावीक कंपनीच्या मोबाइलची बॅटरी विकताना ग्राहकाला सहा महिन्यांची वॉरंटी दिली जाते. वॉरंटीची वस्तू खरेदी केल्यानंतर जीएसटी बिल देणे अपेक्षित आहे. मात्र ग्राहकांना साधे लेखी बिल दिले जाते. त्यावर जीएसटी नंबर नमूद नसतो. सहा महिन्यांच्या आत बॅटरी खराब झाल्यानंतर ग्राहक बॅटरी बदलून घेण्यासाठी दुकानात जातो. त्या वेळी त्याला कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये पाठवण्यात येते. मात्र तेथे गेल्यानंतर ग्राहकांना नियमांचा पाढा वाचून दाखवला जातो. त्यानंतर ग्राहकाला आपली फसवणूक झाल्याचे समजते.सर्व्हिस सेंटरमधून बॅटरी बदलून घेण्यासाठी जीएसटी बिलाची आवश्यकता असते. तसेच बॅटरीची वॉरंटीही तीनच महिन्यांची असते. त्यामुळे बॅटरी बदलून देऊ शकत नाही, असे सांगण्यात येते. तसेच एकाच कंपनीच्या बॅटऱ्या चार प्रकारांत उपलब्ध असतात. साधी बॅटरीही ओरिजिनल बॅटरीप्रमाणेच बॉक्समध्ये ठेवलेली असते. ती साधी बॅटरी ओरिजनल असल्याचे भासवून विक्री करण्यात येते. वास्तविक साध्या बॅटरीच्या बॉक्सवरील माहिती मोठ्या अक्षरात असते, तर ओरिजिनल बॅटरीच्या बॉक्सवरील माहिती ही अतिशय लहान अक्षरांमध्ये नमूद केलेली असते. मात्र याबाबत ग्राहकांना काहीच माहिती नसल्याने डुप्लीकेट बॅटºया वॉरंटी काळ देऊन अव्वाच्या सव्वा दराने विकल्या जातात. ग्राहक पाहून २५० रुपयांपासून ते १६०० रुपयांपर्यंत बॅटरीची किंमत सांगितली जाते. हे झाले बॅटरीचे उदाहरण मात्र इतर साहित्याबाबतही अशीच बनवाबनवी केल्याचे समोर आले आहे.मोबाइल हा सामान्य नागरिकांपासून ते श्रीमंतापर्यंतचा जिव्हाळ्याचा विषय आहे. एखाद्या व्यावसायिकांपासून ते गृहीणीपर्यंत सर्वांनाच मोबाइलची आवश्यकता आहे. त्यामुळे मोबाइलच्या साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची येथे गर्दी असते. याच संधीचा विक्रेते फायदा घेतात. चार रुपयांची वस्तू ४० रुपयांना विकून विके्रते गलेलठ्ठ नफा कमावतात. त्याचवेळी ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागत आहे.ग्राहकांना घाबरवण्याचा प्रयत्नमोबाइल दुरुस्तीत येथे असणारे कारागिर एखाद्या डॉक्टरपेक्षा कमी नाहीत. डॉक्टरकडे गेल्यावर ज्याप्रमाणे डॉक्टर आजारांची माहितीदेऊन पैैसे उकळतात. तशाच प्रकारे मोबाइल दुरुस्ती करण्यासाठी गेल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी सांगून ग्राहकांना घाबरवण्याचा प्रयत्नकेला जातो. आपला मोबाइल खराब होऊ नये यासाठी ग्राहकही ते सांगतील त्यावर विश्वास ठेवून पैैसे खर्च करतात. त्याचाच फायदा घेत मोबाइलचा एक पार्ट खराब झाला असेल तर दहा पार्ट खराब झाल्याचे सांगून पैैसे उकळतात.मोबाइलचे कोणतेही साहित्य घेतले, तरी त्यावर पक्के बिल दिले जात नाही. त्याचप्रमाणे वस्तूचे भावही काहीही सांगितले जातात. मोबाइलचे मोठे मार्केट म्हणून याची ओळख आहे. कोणतीही वस्तू चांगल्या भावामध्ये मिळण्याचे ठिकाण म्हणून ग्राहकांची पसंती असते. मात्र, याचा गैरफायदा घेऊन काही विक्रेते अव्वाच्या सव्वा दराने विक्री करतात. त्यामुळे मार्केटची नावाजलेली ओळख पुसण्याची शक्यता आहे. - माधव दळवी, ग्राहकअ‍ॅक्सेसरीजची नोंद सॉफ्टवेअरमध्ये केली जात नाही. त्यामुळे बिल बनवता येत नाही. परिणामी ग्राहकांना आम्ही जीएसटीचे बिल देऊ शकत नाही. - सचिन चिन्नापुरे, विक्रेते

टॅग्स :Mobileमोबाइलpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGSTजीएसटी