सेवा करण्याची संधी द्या : विनोद तापकीर

By Admin | Updated: February 14, 2017 02:05 IST2017-02-14T02:05:04+5:302017-02-14T02:05:04+5:30

काही नगरसेवक निवडणूक आल्यावर आमच्यावर लक्ष ठेवा असे म्हणतात. यापेक्षा मतदारांचे दुर्दैव दुसरे काय असू शकते. त्यामुळे

Give an opportunity to serve: Vinod Tapkir | सेवा करण्याची संधी द्या : विनोद तापकीर

सेवा करण्याची संधी द्या : विनोद तापकीर

रहाटणी : काही नगरसेवक निवडणूक आल्यावर आमच्यावर लक्ष ठेवा असे म्हणतात. यापेक्षा मतदारांचे दुर्दैव दुसरे काय असू शकते. त्यामुळे माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला साथ द्या. तुमची सेवा करण्याची संधी द्या, पाच वर्षे असे काम करून दाखवेन,तुमच्याकडे मत मागण्यासाठी पुन्हा येणार नाही, असे भावनिक आवाहन प्रभाग क्रमांक २७ मधील अपक्ष उमेदवार विनोद तापकीर यांनी केले. चिन्ह बॅट आहे, हे मतदारांनी लक्षात घ्यावे, असे त्यांनी सांगितले.
तापकीर यांनी मतदारांच्या गाठीभेटीवर सध्या भर दिला आहे. प्रभागातील गतिमान विकासासाठी मला तुमची साथ द्या, या प्रभागातील अनेक सोयी सुविधा अपुऱ्या आहेत. ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र , विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका यासह अनेक सुविधा पुरविण्याचे नियोजन आहे. अनेक आरक्षणे विकसित झालेली नाहीत.
या प्रभागात पालिकेचे रुग्णालय, माध्यमिक शाळा , भाजी मंडई ,हॉकर्स झोन या सुविधांचा अभाव आहे .त्यामुळे आपण साथ द्या, असे तापकीर यांनी आवाहन केले.
तरुण, तडफदार अपक्ष उमेदवार विनोद तापकीर हे या प्रभागाचा चेहरामोहरा बदलू शकतात. आम्हाला विनोद तापकीरच पाहिजेत, असे मत सामाजिक कार्यकर्ते अतुल नढे यांनी व्यक्त केले. (वार्ताहर)

Web Title: Give an opportunity to serve: Vinod Tapkir