चिठ्ठी लिहून तरुणीची आत्महत्या, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन घेतली उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:33 IST2019-02-22T00:33:01+5:302019-02-22T00:33:26+5:30

खराळवाडीतील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तरुणीने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती आली आहे

The girl took the suicide of the girl from the third floor of the building | चिठ्ठी लिहून तरुणीची आत्महत्या, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन घेतली उडी

चिठ्ठी लिहून तरुणीची आत्महत्या, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन घेतली उडी

पिंपरी : खराळवाडीतील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तरुणीने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती आली आहे. ‘मी आत्महत्या करीत आहे, मला शोधू नका’ असे तिने चिठ्ठीत लिहिले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी खराळवाडी येथे घडली. वर्षा शंकर जगताप (वय १९, रा. एचए कॉलनी, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
खराळवाडीतील खराळआई उद्यानाजवळ वैष्णवी पार्क ए जे चेंबर्स ही इमारत आहे. सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास इमारतीच्या डक्टमध्ये काही तरी पडल्याचा मोठा आवाज आला. आजूबाजूचे लोक त्या दिशेने धावले. तिसºया मजल्यावरून उडी मारल्याने खाली पडून मृत्यू झालेली तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीला तत्काळ वायसीएम रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. सुरुवातीला तिची ओळख पटली नसल्याने तिचे छायाचित्र खराळवाडी परिसरात पोलिसांनी नागरिकांना दाखवले. ती एचए कॉलनीतील रहिवासी असल्याचे नागरिकांनी सांगितले. पोलिसांनी एचए कॉलनीत चौकशी केली असता, ती राहत असलेल्या ठिकाणाची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. तिच्या घरात चौकशी केली असता, एका खोलीत तिने लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळून आली.

Web Title: The girl took the suicide of the girl from the third floor of the building