शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
2
“शरद पवारांना भारतरत्न पुरस्कार द्यावा”; राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या खासदाराचे समर्थन
3
Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड
4
मेस्सीला पाहण्यासाठी इतकं महागडं तिकीट, राज्यपाल संतापले; राज्य सरकारकडून मागवला रिपोर्ट
5
पहिल्याच दिवशी ७३% भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट दाखवतोय ₹२५५ चा फायदा, पाहा कोणता आहे आयपीओ?
6
वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार
7
Hero चा धमाका! ४ ते १० वर्षीय मुलांसाठी लॉन्च केली नवी E-Bike; किंमत पाहून थक्क व्हाल
8
Lionel Messi: फुटबॉलचा 'GOAT' मेस्सीच्या ७० फूट उंच पुतळ्याचे व्हर्च्युअल अनावरण
9
भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा मॅच फिक्सिंगचं थैमान, या चार खेळांडूंना केलं, सस्पेंड, FIRही दाखल
10
Messi India Tour: १०० कोटींचे जेट, १०० कोटींचे घर... लियोनेल मेस्सीची नेटवर्थ किती? फुटबॉलचा जादूगार भारताच्या दौऱ्यावर
11
अरेरे! इन्स्टावरचं प्रेम पडलं महागात; बॉयफ्रेंडशी लग्न करण्यासाठी दिल्लीहून रायबरेलीला आली पण...
12
'धुरंधर'मधल्या या अभिनेत्रीला लूक्सवरुन ऐकावे लागलेले टोमणे, नाक आणि दात बदलण्याचा मिळालेला सल्ला
13
आलिशान घर, राईस मिल, पेट्रोल पंप... अधिकाऱ्याकडे सापडलं ४० लाखांसह कोट्यवधींचं घबाड
14
पुढील ३ वर्षांत २ IPO आणण्याची रिलायन्सची तयारी; पाहा काय आहे मुकेश अंबानींचा प्लॅन
15
"मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट
16
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
17
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
18
८५ लाख मतदारांच्या वडिलांच्या नावात गडबड, १३ लाख जणांचे आई-वडील एकच, बंगालमधील SIR मधून धक्कादायक माहिती समोर
19
Crime: प्रेयसीनं संबंध तोडल्यानं भडकला प्रियकर, घरात घुसून तिच्यावर झाडल्या गोळ्या!
20
शुक्र गोचर २०२५: वर्षाखेरिस 'या' ५ राशींना मिळणार धन, संपत्ती करिअरबाबत मोठी भेट
Daily Top 2Weekly Top 5

वाकडमध्ये बस स्टॉपवर थांबलेल्या मुलीला उडविले, कारचालकावर गुन्हा दाखल; व्हिडिओ व्हायरल

By नारायण बडगुजर | Updated: June 12, 2024 16:23 IST

हिंजवडीकडून वाकडकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाकड पुलालगत बस थांब्याजवळ माउली स्नॅक्स दुकानासमोर २३ मे २०२४ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला...

पिंपरी :वाकड येथे बेदरकारपणे कार चालवून तरुणीला धडक दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे खळबळ उडाली. हिंजवडीकडूनवाकडकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाकड पुलालगत बस थांब्याजवळ माउली स्नॅक्स दुकानासमोर २३ मे २०२४ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी बुधवारी (दि. १२) गुन्हा दाखल केला.

तुषार नेमाडे, असे गुन्हा दाखल झालेल्या कारचालकाचे नाव आहे. उत्कर्ष संजयसिंह परदेशी (२३, रा. कॅम्प, पुणे मूळगाव काद्राबाद, जालना) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आकांक्षा संजयसिंह परदेशी (२३, रा. कॅम्प, पुणे मूळगाव काद्राबाद, जालना), असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. भादंवि कलम २७९, ३३७ मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/१७७ अन्वये या अपघात प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याद यांची बहीण आकांक्षा ही २३ मे २०२४ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास हिंजवडीकडून वाकडकडे जाणाऱ्या मार्गावर पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेने चालत जात होती.  त्यावेळी या रस्त्यावरील बसथांब्याजवळ माउली स्नॅक्स दुकानासमोर आकांक्षा चालत जात असताना तुषार नेमाडे याने त्याच्या ताब्यातील कार भरधाव आणि बेदरकारपणे चालवून आकांक्षा हिला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात आकांक्षा जखमी झाली. 

फिर्यादी उत्कर्ष परदेशी याबाबत म्हणाले, अपघातामध्ये माझी बहीण आकांक्षा हिला मुका मार लागला. त्यानंतर आम्ही मुंबइला आलो. ती सध्या नाॅर्मल असून काही दिवस आराम करण्याबाबत डाॅक्टरांनी सांगितले आहे. अपघात प्रकरणी आम्ही फिर्याद दिल्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.    

थरकाप उडवणारा व्हिडिओ...

दरम्यान, या अपघाताचा व्हिडिओ मंगळवारी (दि. ११) सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये आकांक्षा पायी चालत जात असताना पाठीमागून आलेल्या कारने जोरदार धडक दिली. त्यामुळे आकांक्षा काही अंतरावर दूरवर फेकली गेली. तसेच कार भरधाव दुकानात घुसली, असे व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या व्हिडिओत दिसून येत होते. 

पुण्यातील पोर्शे प्रकरण ताजे असतानाच....

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण ताजे असतानाच हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाकड येथे हा थरकाप उडविणारा अपघात झाला. मात्र, याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला नाही. अपघाताच्या सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ व्हायरल झाला. गुन्हा दाखल न झाल्याने सोशल मीडियातून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल केला.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातhinjawadiहिंजवडीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडwakadवाकड