घरातून बाहेर निघून गेली अन् वासनेची शिकार ठरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 02:08 IST2018-10-20T02:08:21+5:302018-10-20T02:08:24+5:30

पिंपरी : घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेली, पदोपदी भेटत गेलेल्या नराधमांच्या वासनेची ती शिकार बनली. एक महिना ...

girl raped in pimpari chinchwad | घरातून बाहेर निघून गेली अन् वासनेची शिकार ठरली

घरातून बाहेर निघून गेली अन् वासनेची शिकार ठरली

पिंपरी : घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेली, पदोपदी भेटत गेलेल्या नराधमांच्या वासनेची ती शिकार बनली. एक महिना तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ दोघांना अटक केली असून, एक आरोपी फरार आहे़


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल अहमद शेख (दिघी) तसेच विनय हनुमंत ननावरे (चक्रपाणी वसाहत, भोसरी) या दोन आरोपींना अटक केली असून, एक आरोपी फरार झाला आहे. आळंदी येथे राहणारी १७ वर्षे वयाची मुलगी घरात कोणाला काही न सांगता, २१ सप्टेंबरला निघून गेली. भाड्याने मोटारी उपलब्ध होत असलेल्या एका संस्थेच्या मोटार चालकाने तिला मोटारीत बसविले. लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पुढे तिला विमाननगर परिसरात सोडून दिले.


विमाननगर परिसरात आणखी एक मोटारचालक भेटला. त्याने तिला स्वत:च्या घरी नेले. काही दिवस घरी ठेवले. तिच्यावर अत्याचार केले. नंतर तिला मित्राच्या ताब्यात दिले. या मित्रानेसुद्धा तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिघांनी अत्याचार केल्यानंतर त्यांच्या तावडीतून तिची सुटका झाली. २१ सप्टेंबर ते १३ आॅक्टोबरपर्यंत तिघांनी तिच्यावर अत्याचार केले.

Web Title: girl raped in pimpari chinchwad