चिखलवाडीत बालकाचा तलावात बुडून मृत्यू

By Admin | Updated: June 30, 2017 03:52 IST2017-06-30T03:52:16+5:302017-06-30T03:52:16+5:30

चिखलवाडी येथील माऊंटवट सोसायटीच्या फेज २ मधील पोहण्याच्या तलावात एका लहान मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

The girl drowns in a mud in a lake | चिखलवाडीत बालकाचा तलावात बुडून मृत्यू

चिखलवाडीत बालकाचा तलावात बुडून मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
खडकी : चिखलवाडी येथील माऊंटवट सोसायटीच्या फेज २ मधील पोहण्याच्या तलावात एका लहान मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. ओमकार प्रशांत गायकवाड (वय ४, रा़ गगनगिरीमा सोसायटी चिखलवाडी, खडकी)हा सोसायटीच्या पाठीमागील भिंतीवर चढून तलावात गेला असल्याचे खडकी पोलिसांनी सांगितले. तलाव बंद असताना ओमकार तलावाच्या परिसरात गेलाच कसा? असा प्रश्न स्थानिक रहिवाशानी उपस्थित केला आहे़
तलावावरील प्रशिक्षक राहुल सावंत म्हणाले, पाणी स्वच्छ कारण्यासाठी मंगळवारी तलाव बंद ठेवला होता. ओमकार तलावात आला कसा हे समजले नाही. सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांना तलाव बंद ठेवला असण्याच्या सूचना दिल्या होत्या. सोसायटीचे कर्मचारी मुळे यांनी सांगितले सुरक्षा रक्षक हे तलावाच्या पुढच्या बाजूला थांबले होते. ओमकार हा पाठीमागे असलेल्या भीतीवर चढून आला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात असून ओमकार च्या मृत्यू ने चिखलवाडी व बोपोडी परिसरात शोककळा पसरली आहे.

Web Title: The girl drowns in a mud in a lake