वृक्षदिंडीद्वारे जनजागृती

By Admin | Updated: July 13, 2015 03:57 IST2015-07-13T03:57:54+5:302015-07-13T03:57:54+5:30

रोटरी क्लब आॅफ चिंचवड मोरया व पिंपरी-चिंचवड पर्यावरण समिती यांच्या वतीने रविवारी चिंचवडमधील चापेकर चौक ते प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहापर्यंत वृक्षदिंडी काढण्यात आली.

Generation of awareness through tree day | वृक्षदिंडीद्वारे जनजागृती

वृक्षदिंडीद्वारे जनजागृती

पिंपरी : रोटरी क्लब आॅफ चिंचवड मोरया व पिंपरी-चिंचवड पर्यावरण समिती यांच्या वतीने रविवारी चिंचवडमधील चापेकर चौक ते प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहापर्यंत वृक्षदिंडी काढण्यात आली. सहभागी झालेल्या १२०० विद्यार्थ्यांनी पर्यावरणाविषयी जनजागृती केली.
या प्रसंगी महापालिका आयुक्त राजीव जाधव, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल सुबोध जोशी, पर्यावरण तज्ज्ञ विकास पाटील, पर्यावरण समितीचे विक्रांत पाटील, नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, रोटरी क्लब आॅफ चिंचवड मोरयाचे अध्यक्ष विनायक घोरपडे, विनय कानेटकर, निळकंठ चिंचवडे, शरद इनामदार, अमित गोरखे आदी उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दिंडीत शहरातील महापालिका व खासगी अशा ३० शाळांमधील १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मुलांनी ‘भारत माता की जय, वंदे मातरम्’चा जयघोष करीत ‘झाडे लावा झाडे जगवा, झाडे वाचवा, कागद वाचवा, वृक्ष एक लाभ अनेक ’ आदी घोषणाद्वारे पर्यावरणरक्षणाचा संदेश दिला.
उपाध्यक्ष राघवेंद्र खेडकर, सचिव मिलिंद चौधरी, विनय कानेटकर, साहेबराव नाईकपवार, प्रवीण
घोरपडे, योगिता सालीमठ, भास्कर झांजड, रामेश्वर लाहोटी,
विलास भोसले, कल्याणी कुलकर्णी, संजय सोंडेकर, मिलिंद साळुंके,
बबन डांगळे, अमोल भोईटे, डॉ.
सुधीर गायकवाड, शिवाजी दिघे
आदी उपस्थित होते. मकरंद टिल्लू आणि योगिता सालीमठ यांनी सूत्रसंचालन केले.(प्रतिनिधी)

Web Title: Generation of awareness through tree day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.