शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सौर ऊर्जेतून ३८०० युनिट वीजनिर्मिती; ‘सुमनशिल्प’ ठरली स्मार्ट हाउसिंग सोसायटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 01:54 IST

भासदांच्या सहकार्याने आर्थिक बाजूंवर मात करीत महिन्याकाठी तब्बल ३८०० युनिट वीज निर्मिती करणारी ३०.२४ किलोवॉट ग्रिड इन्टरअ‍ॅक्टीव्ह सोलर पॉवर प्लान्ट ही सौर ऊर्जा यंत्रणा इमारतीवर लावण्यात आली आहे.

दिघी : स्मार्ट सिटी या संकल्पनेला साजेशी अशी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमधील सौर ऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करणारी संकल्पना साकारत प्रत्यक्षात उतरवली आहे दिघीतील आळंदी रोडवरील परांडेनगर सर्व्हे क्रमांक ८५/१/१ मधील सुमनशिल्प फेज क्रमांक एक या सोसायटीने. सभासदांच्या सहकार्याने आर्थिक बाजूंवर मात करीत महिन्याकाठी तब्बल ३८०० युनिट वीज निर्मिती करणारी ३०.२४ किलोवॉट ग्रिड इन्टरअ‍ॅक्टीव्ह सोलर पॉवर प्लान्ट ही सौर ऊर्जा यंत्रणा इमारतीवर लावण्यात आली आहे. यामधून निर्माण होणारी वीज बाजारभावानुसार चाळीस हजार रुपये किमतीची आहे. त्यामुळे वीज बिलामध्ये बचत होत आहे. वीज वाचविण्याची दुहेरी किमया साधली आहे. त्यामुळे वीज निर्माण करणारी स्मार्ट सिटीतील स्मार्ट सोसायटी म्हटले तर वावगे ठरू नये.महावितरण कंपनीला वीजपुरवठाइमारतीच्या टेरेसवर २७० स्क्वेअर मीटर जागेवर हे सौर ऊर्जेचे पॅनल उभारले आहेत. एक पॅनलची लांबी रूंदी एक बाय दोन अशी असून या पॅनेलमधून ३१५ वॅट्स वीज निर्मिती होते. अशी ही एकुण ९६ पॅनेल बसवून महिन्याला तब्बल तीस हजार दोनशे चाळीस वॅट्स वीज निर्माण होणार आहे. दर दिवसाला दिवसभरात १२० ते १२५ युनिट वीज तयार होणार आहे. ही दिवसभरात तयार झालेली वीज, महावितरण कंपनीला देण्यात येणार आहे.दिवसभरात किती वीज तयार झाली व महावितरण कंपनीने किती वापरली ही आकडेवारी एका मीटरवर नोंद होणार आहे. व नंतर सोसायटीने महावितरण कंपनीची वापरलेली एकुण वीज व सोसायटीने निर्माण केलेली वीज यामधून वजा होऊन शिल्लक राहिलेल्या युनिटचेच बील फक्त सोसायटीला भरावे लागणार आहे. तीन ते चार वर्षांत गुंतवणुक केलेले पैसे वसूल होऊन नंतर ही सेवा मोफत अशीचं होणार आहे. सोसायटीला नावारूपाला आणण्यासाठी सोसायटीचे अध्यक्ष देवराम शेळके, सचिव विकास जाधव, खजिनदार नितिन हांडे, शंकर कंदले, दिपक घाग, सचिन कुंभार, मोहन राऊत, उमेश नागरगोजे यांनी पुढाकार घेतला आहे.शून्य कचरा प्रकल्पसोसायटीतील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्प साकारला आहे. हे खत सोसायटीतील बागेतील झाडांना देण्यात येते. खत विक्रीही केली जाते. सेंद्रिय खताचा वापर करून पालेभाज्या, फळभाजांचे उत्पादन घेण्यात येत आहे. इ कचरा वेगळा करण्यासाठी यंत्रणा आहे. देशी वृक्ष लागवड, कबुतरांच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी इमारतीवर लावलेल्या जाळ्या, चिमण्यांसाठी घरटे, पाणी, चारा मिळावा अशी सोसायटीच्या आवारात सोय केली आहे.पावसाळ्यात टेरेसवर पडणारे चार महिन्यांचे पाणी सोसायटीतील विहिरीत साठवून रेन वॉटर हार्वेस्टिंग करीत टॅकरमुक्त सोसायटी असा नावलौकिक प्राप्त झाला आहे. इमारतीच्या आवारातील बागेतील झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धती वापरून पाण्याची नासाडी थांबवून बचत केली आहे. सुरक्षेची काळजी घेत सीसीटीव्ही कॅमेरे, दुचाकी, चारचाकी वाहनांची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था अशा अनेक सुविधा आणि सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.वीजबिलात कपातसुमनशिल्प सोसायटीमध्ये चार विंग आहेत. ११२ सदनिका आहेत. यापूर्वी सोसायटीला येणारे एकत्रित बील ९० हजार रुपयांपर्यंत होते. नंतर यामध्ये कपात करीत ते बील चाळीस ते पंचेचाळीस हजारावर आणून ठेवले. असे असले तरी अशा मोठ्या रकमेची बीले सोसायटीतील सभासदांना कधीही न परवडणारे होते. त्यामुळे या बीलावर तोडगा काढण्यासाठी सौर ऊजेर्चा वापर करून वीज निर्मिती करण्याची संकल्पना पुढे आली. मात्र या यंत्रणेला लागणारा प्राथमिक खर्च बावीस लाख रुपए आहे. हा खर्च सोसायटीच्या आवाक्याबाहेरचा होता. पण ही किंमत बघूनही सभासद मागे फिरले नाहीत. त्यांनी सहभागातून या परिस्थितीवरसुध्दा मात करीत सबसिडी वगळता तब्बल साडेसोळा लाख रुपए गोळा केले. प्रत्येक सभासदांनी आपल्या सदनिकेचा देखभाल दुरूस्ती खर्च महिन्याला न भरता एकदाच वर्षाचा भरून तर कुणी मोठी रक्कम गुंतवणुक करून येणाºया व्याजामधून खर्च भरण्याची तजवीज केली. त्यामुळे हा सौर ऊर्जेवर चालणारा वीज निर्मिती प्रकल्प उभा राहिला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड