शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

गॅस सिलिंडर रिफिलिंगमधून नागरिकांच्या जिवाशी खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 01:16 IST

गॅस वितरकांच्या वाहनावर काम करणाऱ्यांशी हातमिळवणी करून गॅस सिलिंडरचा काळाबाजार केला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी बेकायदा गॅस रिफिलिंग केंद्र उघडण्यात आली आहेत.

- मंगेश पांडेपिंपरी : गॅस वितरकांच्या वाहनावर काम करणाऱ्यांशी हातमिळवणी करून गॅस सिलिंडरचा काळाबाजार केला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी बेकायदा गॅस रिफिलिंग केंद्र उघडण्यात आली आहेत. या केंद्रांवर अत्यंत ज्वलनशील असलेला गॅस धोकादायक पद्धतीने एका सिलिंडरमधून दुसºया सिलिंडरमध्ये भरला जातो. या गॅस रिफिलिंगच्या रॅकेटमधून एकप्रकारे नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचाच प्रकार सध्या शहरात राजरोसपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे.अधिकृत गॅस वितरकाकडून सध्या घरगुती वापराचा १४ किलो २०० ग्र्रॅमचा गॅस सिलिंडर आठशे रुपयांना दिला जातो. त्यानंतर सबसिडीची २९८ रुपयांची रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे हा सिलिंडर ग्राहकाला ५०२ रुपयांना मिळतो. मात्र, अनेक जण हा आठशे रुपयांचा सिलिंडर घेत नाहीत. त्यामुळे पाच किलो गॅस मावेल या आकाराचे रिकामे सिलिंडर घेतले जातात. या सिलिंडरमध्ये गॅस शेगडी दुरुस्तीच्या दुकानांसह भांड्याच्या दुकानांमध्ये बेकायदारित्या गॅस भरून दिला जात आहे. ‘गॅस रिफिलिंग रॅकेट’ चालविणारे त्यांना या छोट्या आकाराच्या सिलिंडरमध्ये गॅस भरून देतात. अशाप्रकारे गॅसचा काळाबाजार करणाºयांची मोठी साखळी शहरात कार्यरत आहे.चिखली, कुदळवाडी, भोसरी, पिंपरी, रहाटणी, निगडी, काळेवाडी, पिंपळे सौदागर आदी भागांत अशाप्रकारे सर्रासपणे गॅस रिफिलिंग केले जात आहे. मात्र, परिमंडळ कार्यालयाच्या अधिकाºयांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.गॅस वितरकांच्या वाहनावर काम करणाºयांकडून ९०० ते १००० रुपयांना गॅस सिलिंडर घेतला जातो. त्यानंतर १०० अथवा १५० रुपये किलोप्रमाणे छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरून देतात. त्यामुळे त्यास १४ किलोच्या गॅसमधून प्रतिकिलो १५० रुपये प्रमाणे गॅसची विक्री केल्यास १ हजार १०० रुपये मिळतात.गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने रिफिलिंग करताना एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही धोकादायक पद्धतीने व राजरोसपणे हा उद्योग केला जात आहे. दोन वर्षांपूर्वीच चिखली येथे अशापद्धतीने गॅस रिफिलिंग करीत असताना स्फोट झाला होता. यामध्ये सिलिंडर उंच हवेत उडून डोक्यात लागल्याने गंभीर जखमी झालेल्या ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. या वेळी लागलेल्या आगीत आजूबाजूच्या दुकानांचेही नुकसान झाले.अशाप्रकार बेकायदा गॅस रिफिलिंग करणाºयांचे मोठे रॅकेट सध्या पिंपरी-चिंचवड शहरात कार्यरत आहे. राजरोसपणे गॅसचा काळाबाजार होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दाट लोकवस्तीच्या ठिकाणी बिनधास्तपणे एका सिलिंडरमधून दुसºया सिलिंडरमध्ये धोकादायक पद्धतीने गॅस भरला जातो.दरम्यान, एखादी दुर्घटना घडल्यास मोठे नुकसान होऊ शकते. याची कल्पना असतानाही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. यामुळे गॅस रिफिलिंगचे रॅकेट चालविणाºयांवर परिमंडळ कार्यालयाकडून कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. केवळ कधीतरीच एखाद्या दुकानावर कारवाई करून कारवाईचा दिखावा केला जातो. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशसनाला जाग येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे