शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कचरा निविदेतील ठेकेदारांना काळ्या यादीत टाका : आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 20:34 IST

कचरा निविदेवरून सत्ताधारी आणि विरोधकांत जुंपली आहे

ठळक मुद्देदोन्ही ठेकेदारांना उच्च न्यायलयात जाण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती एका टनामागे चारशेचा फरक असेल तर मोठ्याप्रमाणावर बचत होणार

पिंपरी: कचरा संकलन आणि वाहतूक कामाचा दर्जा व उत्तम काम होईल. यासाठी महापालिकेचे ११६ कोटी रुपये नुकसान करुन ठेकेदारांना कामाचे आदेश दिले. मात्र, त्यांनी काम सुरू केलेले नाही. त्यामुळे जुण्याच ठेकेदारांकडून काम करण्याची नामुष्की ओढावली आहे. काम न करणाºया कचरा संकलन निविदेतील दोन्ही ठेकेदारांना काळया यादीत टाकावे, अशी मागणी महापालिकेतील विरोधीपक्षनेते दत्त्ता साने यांनी केली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. कचरा निविदेवरून सत्ताधारी आणि विरोधकांत जुंपली आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, पिंपरी- चिंचवड शहरातील घरोघरीचा कचरा एकत्र करुन तो मोशी कचरा डेपोपर्यंत वाहून नेणे या कामाच्या निविदेतील उच्च न्यायालयाच्या आदेशास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊन बीव्हीजी व एजी एन्वायरो या कंपन्यांचे कामाचे आदेश थांबविण्यात यावेत. कारण या दाव्यामध्ये मनपा कायदा विभाग व आरोग्य विभागामार्फत नव्याने काढलेल्या ४ च्या निविदेतील निविदाकारांनी दरांची पाकिटे उघडण्याबाबत उच्च न्यायालयास कोणतीही विनंती केलेली नाही.  जाणीवपूर्वक दोन्ही ठेकेदारांना उच्च न्यायलयात जाण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती केली. बीव्हीजी व एजी एन्वायरोच्या दरांच्या दुलनेत नव्याने काढलेल्या ४ च्या निविदेतील निविदाकारांची दरपत्रके हि जवळपास चारशे रुपयांनी कमी आहेत. एका टनामागे चारशेचा फरक असेल तर मोठ्याप्रमाणावर बचत होणार आहे. प्रतिदिन पिंपरी चिंचवड शहरातून हजार टन कचरा मोशी कचरा डेपो येथे  वाहून नेला जातो. वषार्ला १४ कोटी ६० लाख रुपए, तर आठ वर्षे एकुण ११६ कोटी ८० लाखाचा भार पडणार आहे. १ एप्रिलपासून दोन कंपन्यांनी काम सुरू केले आणि दोन दिवसातच काम बंद करण्याची नामुष्की ठेकेदारांवर आली. कच-याची समस्या सोडविण्यासाठी अकार्यक्षम असणाºया दोन ठेकेदार काम सुरू करण्यास चालढकल करीत आहेत. कामाचा दर्जा व उत्तम काम होईल. यामुळे महापालिकेचे ११६ कोटी रुपये नुकसान करुन ठेकेदारांना कामाचे आदेश दिले. मात्र, त्यांनी काम सुरू केलेले नाही. जुन्याच ठेकेदारांकडून पुन्हा मुदतवाढ देऊन काम चालू ठेवण्याची नामुष्की मनपावर ओढावली आहे. शहरात कच-याची समस्या गंभीर झालेली आहे. ठिकठिकाणी कच-याचे ढीग साचलेले आहेत, त्यामुळे शहराचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.  व नागरीकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. दोन्ही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGarbage Disposal Issueकचरा प्रश्नshravan hardikarश्रावण हर्डिकर