शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

Ganesh Visarjan: गणपती बाप्पा मोरया! पिंपरीत दीड दिवसांच्या गणपतीला निरोप

By विश्वास मोरे | Updated: September 8, 2024 19:30 IST

शहरात ८५ ठिकाणी विसर्जनाची सोय महापालिकेच्या वतीने केली होती

पिंपरी: अधून- मधून उसंत घेऊन पडणाऱ्या सरी आणि 'गणपती बाप्पा मोरया...'  म्हणत, घरगुती प्रतिष्ठापना केलेल्या दीड दिवसाच्या गणरायाला पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी निरोप दिला. शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी घाटावर बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.  नोकरदार वर्गाने बाप्पाना निरोप दिला.   उद्योगनगरीत शनिवारी गणरायाचे आगमन झाले. गणेशभक्तांत अपूर्व उत्साह शहरात जाणवत होता. दीड दिवसाच्या गणपतीची प्रतिष्ठापना होते, तोच त्यांना निरोप देण्याची वेळ आली. त्यामुळे गणेशभक्तांना रुखरुख लागली. त्यामुळे आज सकाळपासूनच घरोघरी विराजमान झालेल्या दीड दिवसाच्या गणपतीला मोदक, पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवून विसर्जन केले. 

नोकरदार वर्गाने दिला बाप्पाना निरोप 

कामगारनगरी आहे. त्यामुळे नोकरदार वर्गामध्ये दीड दिवसासाठी गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचे प्रमाणही अधिक आहे. रविवारी दुपारपासून पवना, मुळा आणि इंद्रायणी घाटावर विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याठिकाणी सायंकाळच्यावेळी विसर्जनासाठी भाविक येताना दिसत होते. तर अधून- मधून पावसाच्या सरी पडत होत्या. त्यामुळे पावसापासून वाचण्यासाठी गणपतीवर धरलेल्या छत्र्या सावरत, गणेशमूर्तींवर प्लास्टिकचे आच्छादन घालून गणेश तलाव, रावेत जाधव घाट, चिंचवड थेरगाव घाट, मोरया घाट, काळेवाडी घाट, पिंपरी घाट यांच्यासह एकूण ८५ ठिकाणी विसर्जनाची सोय महापालिकेच्या वतीने केली होती. त्याठिकाणी वैद्यकीय आणि आरोग्यविषयक पथक, नदी प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम हौदही तयार केले आहेत. तसेच नदी घाटावर अग्निशामक दलाचे आणि सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात होता.  विसर्जनस्थळी बाप्पाला निरोप देताना भाविकांना गलबलून आले होते.  ऋषिपंचमी निमित्त चिंचवड गावातील पवना, मुळा आणि इंद्रायणी तीरी महिलांनी पूजाही केली. चिंचवड मोरया गोसावी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४SocialसामाजिकMuncipal Corporationनगर पालिकाWaterपाणी