शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात बंद झालेला जुगार-मटका पिंपरी-चिंचवडमध्ये राजरोसपणे सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 17:34 IST

पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्ष : हप्तेगिरीने वाढली उद्योगनगरीतील गुन्हेगारी... 

ठळक मुद्देपिंपरी, चिंचवड, भोसरी, भोसरी, दिघी, आळंदी, चाकण, देहूरोड व निगडी येथे अवैध धंदे

पिंपरी : पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने कडक निर्बंध आणल्याने सर्व अवैध जुगार व मटका व्यवसाय पिंपरी-चिंचवड शहरात स्थलांतरित झाले आहेत. पिंपरी, चिंचवड, भोसरी, एमआयडीसी भोसरी, दिघी, आळंदी, चाकण, देहूरोड व निगडी या पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. विशेष म्हणजे या अवैध धंद्यांना राजकीय व गुन्हेगारांचा राजाश्रय असल्याचे माहिती असूनही हप्तेगिरीमुळे पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे.  पिंपरी-चिंचवड शहराचा विकास औद्योगिक क्षेत्रामुळे झपाट्याने झाला. नोकरी व व्यावसायासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह परराज्यांतील तरुण रोजगारासाठी येथे स्थायिक झाला आहे. त्याचबरोबर रोज बेरोजगारांचा लोंढा शहरात येत आहे. येथील कामगारांकडे पैसा असल्याने येथे अनेक अवैध उद्योगधंद्यांना चांगली चलती आहे. त्यामुळेराज्यात नागपूरनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वाधिक गुन्हेगारीचे प्रमाण आहे. 

* निगडी उड्डाणपुलाच्या परिसरात लॉटरीची दुकाने असून, यापैकी काही दुकानात लॉटरीच्या नावाखाली मटका सुरू आहे. परिसरातील नागरिकांच्या तक्रारी असूनही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचे येथील महिलांचे म्हणणे आहे. शहरातील विविध भागात ३६ लॉटरीच्या दुकानात लॉटरीचे फलक लावून आतमध्ये मटका व जुगाराचे अवैध धंदे सुरू आहेत. या दुकानांमध्ये सोरेट, काळे पांढरे, चिंमणी पाखरे असे जुगार टेबल सुरू आहेत.* गुन्हेगारी रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची स्थापना दीड वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट २०१८ ला करण्यात आली. त्यानंतरही गुन्हेगारीचे प्रमाण पुरेसे कमी झालेले नाही. उलट महिला अत्याचार, विनयभंग, वाहनचोरी व दरोडे वाढले आहेत. या सर्व गुन्हेगारी वाढण्याचे मूळ शहरातील जुगार, मटका व अवैध व्यवसाय हे आहे. मात्र, पोलीस आयुक्तालयानंतरही अवैध उद्योग थांबलेले नाहीत.

...................... 

* कामगारांचे झाले संसार उद्ध्वस्त उद्योगनगरीतील गुन्हेगारी रोखण्यासाठी अवैध धंदे पुणे शहराप्रमाणे १०० टक्के बंद होण्याची आवश्यकता आहे. उलट, पुणे शहरातून हद्दपार केलेले जुगार व मटका पिंपरी-चिंचवड शहरात मात्र राजरोस सुरू आहेत. या अवैध धंद्यांचे व्यसन लागल्याने शहरातील अनेक कामगारांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत.  ........* मटका-जुगार सुरू असलेली ठिकाणे    वाल्हेकरवाडी येथील राजवाडा हॉटेलपासून काही अंतरावर     चिंचवड रेल्वे स्टेशन मालधक्का येथील पुलाखाली   लिंकरोड येथील रमाबाईनगर परिसरात मटका सुरू 

काळेवाडी पाचपीर चौक परिसरात मटका सुरू    रहाटणी येथे विमल गार्डन समोरील नदीच्या बाजूला    थेरगाव येथील वेंगसरकर अ‍ॅकॅडमीच्या परिसरात   निगडी गावठाण व ओटा स्किम येथे मटका सुरू 

    चिंचवड अजंठानगर व चिखली रोड      सांगवी व कासारवाडी रेल्वे स्टेशनशेजारी     पिंपळे-निलख येथील नदीच्या बाजूला    भोसरी येथील कबरस्थान शेजारील शाळेमागे    भोसरी पीएमपी बस थांब्याजवळ जगदंबा हॉटेलमागे    मोशी येथे एक व देहूफाटा येथील एका जीम मागे  आळंदी-मरकळ रोड व देहूरोड...........

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस