शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले रायगडावरील सुवर्ण सिंहासनासाठी वाल्हेकरवाडी ग्रामस्थ व धारकऱ्यांकडून ३ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 15:59 IST

किल्ले रायगडावर जानेवारीत संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली ३२ मण हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन पुनरसंस्थापन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे३२ मण हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन करण्यात येणार पुनरसंस्थापनतीन लाख रुपयांचा धनादेश खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत प्रदान

रावेत : किल्ले रायगडावर जानेवारीत संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली ३२ मण हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन पुनरसंस्थापन करण्यात येणार आहे. या सुवर्ण सिंहासन उभारणीसाठी वाल्हेकरवाडी ग्रामस्थ व धारकऱ्यांकडून तीन लाख रुपयांचा धनादेश खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत सुवर्ण सिंहासन संकल्प प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांच्या कडे सुपूर्त करीत कर्तव्यपूर्तीचा पहिला टप्पा प्रदान केला.वाल्हेकरवाडीतील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखेच्या सर्व धारकऱ्यांच्या आग्रहाला मान देवून आज सकाळी सात वाजता संभाजी भिडे गुरुजी रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांच्या निवासस्थानी आले होते. त्या वेळी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते. संजय ब जठर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पुणे जिल्हा प्रमुख अविनाश मरकळे, संपर्क प्रमुख सचिन थोरात, चिंचवड विभाग आणि वाल्हेकरवाडीतील धारकरी संदीप वाल्हेकर, गजानन चिंचवडे, शेखर चिंचवडे, आनंदा वाल्हेकर, सुभाष वाल्हेकर, युवराज वाल्हेकर, सोमनाथ मुसुडगे, सोमनाथ हरपुडे, हेमंत गवंडे, राजकिरण ठाकूर, तुषार वाल्हेकर, धनंजय म्हस्के, प्रवीण रसाळ, बाळू शिवले, संतोष वाघ, गणेश भुजबळ व सुयोग वाल्हेकर, तन्मय वाल्हेकर, अभिषेक वाल्हेकर, रसिका वाल्हेकर इत्यादी उपस्थित होते.यावेळी गुरुजी म्हणाले, की वाल्हेकरवाडी व चिंचवड परिसरातून वीस ते चाळीस वयोगटातील शेकडो तरुण घेऊन मोहिमेला जानेवारीत सहभागी व्हा व या सुवर्ण सिंहासन पुनरसंस्थापन न्यसाला कर्तव्यपूर्ती म्हणून आपण पिंपरी चिंचवड परिसरातून तीस किलोपर्यंतच्या सुवर्ण संचयनासाठी धनाचे संकलन करा.यावेळी गो-सेवक खिलारप्रेमी संदीप पोपटराव वाल्हेकर यांच्या गोशाळेला भेट देऊन त्यांनी हा देशी गाई संगोपन उपक्रम घरोघरी व्हावा, याने देशाचे कल्याण होईल, असे मार्गदर्शन केले. वाल्हेकर कुटुंबीयांकडून गुरुजींना विठ्ठल मूर्ती सप्रेम भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन संदीप पोपटराव वाल्हेकर व गणेश भुजबळ यांनी केले.

टॅग्स :Puneपुणे