शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रावण टोळीतील फरार आरोपींना कराडमधून सिनेस्टाईल पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 18:59 IST

आरोपी हे कराड तालुक्यातील घारेवाडी गावच्या जवळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आणि कराड पोलिसांनी मिळून आरोपींना सापळा लावला

पिंपरी: शहरातील कुविख्यात रावण टोळीच्या सदस्यांना कराड येथून सिनेस्टाईल पकडण्यात आले. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने कराड पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतले. तसेच फायरिंगच्या दोन गुन्ह्यात फरार असलेल्या एका सराईत आरोपीला देखील गुंडा विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या.

सुरज चंद्रदत्त खपाले (वय २२), हृतिक उर्फ मुंग्या रतन रोकडे (वय २१), सचिन नितीन गायकवाड (वय २१), अक्षय गोपीनाथ चव्हाण (वय २४, सर्व रा. चिखली), अशी अटक केलेल्या रावण टोळीतील अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच फायरिंगच्या दोन गुन्ह्यात अनिरुद्ध उर्फ बाळा उर्फ विकी राजू जाधव (वय २४, रा. जाधववस्ती, रावेत) फरार होता. त्यालाही पोलिसांनी अटक केली.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, रावण टोळीतील अटक केलेल्या सदस्यांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा चिखली पोलीस ठाण्यात दाखल आहे. पिंपरी -चिंचवड पोलिसांनी त्यांच्यावर मोक्काची देखील कारवाई केली आहे. हे आरोपी फरार होते. गुंडा विरोधी पथकाच्या पोलिसांनी दहा दिवस गोवा, महाबळेश्वर, कराड येथे वास्तव्य करून आरोपींचा ठावठिकाणा शोधला.

आरोपी हे कराड तालुक्यातील घारेवाडी गावच्या जवळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आणि कराड पोलिसांनी मिळून आरोपींना सापळा लावला. त्यावेळी आरोपी राहत असलेल्या ठिकाणी पोलिसांचे पथक दबा धरून होते. त्यावेळी आराेपी हे उसाच्या शेतात पळून जाण्याच्या तयारीत असताना अर्धा तास झटापट करून त्यांना पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले. रावण टोळीचा आणखी एक सक्रिय सदस्य अनिरुद्ध जाधव याला देखील शिताफीने पकडले. अनिकेत हा चोपडा पोलीस ठाणे जळगाव, उत्तमनगर पोलीस ठाणे पुणे शहर आणि वाकड पोलीस ठाण्यातील तीन गुन्ह्यात फरार होता.     

गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस अंमलदार हजरत पठाण, प्रवीण तापकीर, गंगाराम चव्हाण, विजय तेलेवार, गणेश मेदगे, रामदास मोहिते, शुभम कदम, ज्ञानेश्वर गिरी, तांत्रिक विश्लेषण विभागाचे सहाय्यक फौजदार राजेंद्र शेटे, पोलीस हवालदार नागेश माळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 

आरोपींना पोलीस कोठडीआरोपी सुरज, हृतिक, सचिन आणि अक्षय या आरोपींना चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांना बुधवारपर्यंत (दि. १३) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी अनिकेत याला वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अनिकेत याच्याकडून पोलीसांनी दोन पिस्तूल आणि पाच जिवंत काडतूसे जप्त केली. तसेच आरोपी अनिकेत याला मंगळवारपर्यंत (दि. १२) पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या कामगिरीबद्दल गुंडा विरोधी पथकाला ५० हजारांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी