नीरेत हत्याकांडाविरुद्ध मोर्चा

By Admin | Updated: October 29, 2014 22:56 IST2014-10-29T22:56:32+5:302014-10-29T22:56:32+5:30

पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा या गावात झालेल्या तिहेरी हत्याकांडाच्या घटनेचा मोर्चा काढून निषेध व्यक्त करून या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी,

Front against Nerat killings | नीरेत हत्याकांडाविरुद्ध मोर्चा

नीरेत हत्याकांडाविरुद्ध मोर्चा

नीरा : पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा या गावात झालेल्या तिहेरी हत्याकांडाच्या घटनेचा मोर्चा काढून निषेध व्यक्त करून या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी विविध संघटनांनी नीरा पोलिसांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. पुरंदर तालुक्यातील 
आरपीआय, बहुजन हक्क परिषद या संघटनांच्या कार्यकत्र्यांसह ग्रामस्थांनी हत्याकांडाचा नीरा शहरातील 
प्रमुख मार्गावरून मोर्चा काढून निषेध केला. 
या वेळी कार्यकत्र्यांनी या हत्याकांडातील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन अटक करून तपास करण्यात दिरंगाई करीत असल्याच्या कारणावरून घोषणा देत पोलीस प्रशासनाचा निषेध केला. मोर्चाचे नीरा पोलीस दूरक्षेत्नाच्या आवारामध्ये छोटयाश्या सभेत रूपांतर झाले. या सभेत अनेक कार्यकत्र्यांनी हत्याकांडातील गुन्हेगारांचा त्वरित शोध घेऊन पोलिसांनी आरोपींना अटक करावी, अशी तीव्र भावना व्यक्त केली. प्रमुख कार्यकत्र्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांना यासंदर्भात निवेदन दिले. 
विविध संघटनांचे दादा गायकवाड, संजय सोनावणो, गणोश गडदरे, नंदू ढावरे, सचिन मोरे आदींनी या वेळी मनोगत व्यक्त केले. ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, माजी उपसरपंच कुमार मोरे, सुहास वाघमारे, राहुल थोपटे, रवींद्र काकडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. 
(वार्ताहर)

 

Web Title: Front against Nerat killings