ग्राहकांना मिळाले मोफत अर्ज
By Admin | Updated: November 13, 2016 04:21 IST2016-11-13T04:21:21+5:302016-11-13T04:21:21+5:30
ओळखपत्र व डिक्लरेशन फॉर्मवरून ग्राहक आणि महावितरण कर्मचारी यांच्यात वाद झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती. कागदपत्रांशिवाय बिल स्वीकारणार नाही अशी भूमिका

ग्राहकांना मिळाले मोफत अर्ज
चिंचवड : ओळखपत्र व डिक्लरेशन फॉर्मवरून ग्राहक आणि महावितरण कर्मचारी यांच्यात वाद झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती. कागदपत्रांशिवाय बिल स्वीकारणार नाही अशी भूमिका कार्यालयाने घेतल्याने वाद वाढला होता.काही केंद्रांवर अर्जा ची काळ्या बाजारात विक्री सुरु होती. या बाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच खडबडून जाग आलेल्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मोफत वाटप केले.
शहरातील महावितरण कार्यालयात वीज बिलभरणा करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. ५०० व १००० रुपयांच्या नोटा या भरण्यात मान्यता दिली असल्याने ग्राहक गर्दी करीत आहेत. शुक्रवारी अशा नोटांचा भरणा करताना ग्राहकांना अडचणी येत होत्या. ओळखपत्र व डिक्लरेशन फॉर्म भरण्यावरून संभ्रम निर्माण झाला होता.
या फॉर्मसाठी काही ठिकाणी पाच रुपये आकारले जात होते. यावरून ग्राहक व कर्मचारी यांच्यात वाद झाले. अखेर पोलिसांच्या बंदोबस्तात वीज बिल भरणा सुरू करावा लागला.
अशा घटनांबाबात वरिष्ठ अधिकारीही असे प्रकार घडेल नसल्याचे सांगून हात वर केले होते. मात्र, ज्या ग्राहकांनी अर्जासाठी पैसे दिले ते संतप्त झाले होते. आज लोकमतने ‘काळ्याबाजाराने अर्जाची विक्री’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेत ग्राहकांना मोफत अर्ज देण्यात येत होते. अर्जवाटप करण्यासाठी कार्यालयाबाहेर टेबलवर दोन कर्मचारी ग्राहकांना मोफत अर्जवाटप करून अर्ज भरण्यासंदर्भात माहिती देत होते. नोटा स्वीकृतीसाठी मुदतवाढ मिळाल्याने आज वीज बिल भरणा केंद्रावर रांगा लागल्या होत्या.
(वार्ताहर)