शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे कनेक्शन कट करण्याची भीती घालून फसवणूक; व्यावसायिकाला दोन लाख ६५ हजारांचा गंडा

By नारायण बडगुजर | Updated: February 21, 2025 17:06 IST

व्हाॅट्सॲपवर एक एपीके फाईल पाठवून त्याआधारे व्यावसायिकाच्या बँक खात्यातून दोन लाख ६५ हजार रुपये काढून घेत फसवणूक

पिंपरी : अनोळखी व्यक्तींनी आपण पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातून बोलत असल्याचे भासवून एका व्यावसायिकाचे पाण्याचे कनेक्शन कट करण्याची भीती घालण्यात आली. व्यावसायिकाला व्हाॅट्सॲपवर एक एपीके फाईल पाठवून त्याआधारे व्यावसायिकाच्या बँक खात्यातून दोन लाख ६५ हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना १६ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत निगडी येथे घडली.

रतनलाल मुरलीधर शर्मा (७६, रा. यमुनानगर, निगडी) यांनी याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दिवेश जोशी नावाने बोलणारा व्यक्ती आणि इतर अनोळखी व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी फिर्यादी शर्मा यांना फोन करून चालू महिन्याचे पाण्याचे बिल अपडेट नसल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याचे कनेक्शन कट करणार असल्याची भीती घातली. त्यानंतर तत्काळ अधिकारी दिवेश जोशी यांना संपर्क करण्यास सांगून संशयितांनी शर्मा यांना व्हाॅट्सॲपवर पाइपलाइन वॉटर अपडेट नावाने एपीके फाईल पाठवली. ती फाईल डाउनलोड करण्यास भाग पाडून शर्मा यांच्या बँक खात्याची माहिती घेत त्यांच्या खात्यावरून इतर खात्यावर दोन लाख ६५ हजार ५०९ रुपये काढून घेत फसवणूक केली.

महापालिका आयुक्तांच्या नावाने मेसेज

संशयितांनी पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक लोकांना अशा पद्धतीने मेसेज पाठविले. या महापालिका आयुक्तांच्या नावानेही वेगवेगळ्या नंबरवरून मेसेज पाठविले. तसेच पीबी बिल अपडेट करण्यास सांगून एपीके फाईल डाउनलोड करण्यास सांगून काही लोकांची फसवणूक केल्याचेही प्रकार घडले आहेत.

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

नागरिकांनी अशा कोणत्याही बनावट मेसेजला प्रतिसाद देऊ नये. तसेच एपीके फाईल डाउनलोड करू नये. असा बनावट मेसेज आल्यास स्थानिक पोलिस ठाणे किंवा सायबर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे