तळेगाव : तळेगाव रेल्वे स्टेशन जवळील वीरचक्र चौक येथे अवैधरित्या आॅनलाईन जुगार अड्डा चालविणाऱ्या आरोपींना गुरुवारी(दि.२३) पोलिसांनीअटक केली. चारही आरोपींवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या सर्व आरोपींना वडगाव मावळ न्यायालयात हजर करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मयूर शिवाजी बोऱ्हाडे (वय २६ रा. शिरूर जि.पुणे), कोमीर वसंत बुराडे (वय २८), अजय दिलीप गायकवाड (वय १९), विठ्ठल मानाजी सांगळे (तिघेही रा. तळेगाव दाभाडे ता. मावळ) असे अवैध आॅनलाईन जुगार अड्डा चालविणाऱ्या आरोपींची नावे आहेत. सहाय्यक उपायुक्त श्रीधर जाधव यांना तळेगाव स्टेशन भागात आॅनलाईन अवैध जुगारअड्डा चालू असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली.पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, कर्मचारी सुर्यकांत गोरडे, विठ्ठल वडेकर, दीपक कदम आदींनी घटनास्थळी छापा टाकून मयूर बोऱ्हाडे व त्यांचे साथीदार कोमीर बुराडे, अजय गायकवाड, विठ्ठल सांगळे यांना रंगेहाथ पकडत अटक केली. हे आरोपी आॅनलाईन जुगार अड्डा चालवित होते. त्यांच्याकडून रोख रक्कम ८ हजार ४०० रुपये, ४२ इंची टीव्हीस्क्रीन, संगणक, सीपीयू, कीबोर्ड, डोंगल असा एकूण ४५ हजार ९०० रुपयांचा माल हस्तगत केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे करत आहेत.
तळेगाव स्टेशन येथे आॅनलाईनद्वारे अवैध जुगारअड्डा चालविणाऱ्या चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 15:17 IST
तळेगाव रेल्वे स्टेशन जवळील वीरचक्र चौक येथे अवैधरित्या आॅनलाईन जुगार अड्डा चालविणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली.
तळेगाव स्टेशन येथे आॅनलाईनद्वारे अवैध जुगारअड्डा चालविणाऱ्या चौघांना अटक
ठळक मुद्देआरोपींकडून ४५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत