शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आळंदी येथे देशी बनावटीच्या पिस्तुलासह चार जिवंत काडतुसे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 15:28 IST

तडीपार गुन्हेगार जेरबंद 

ठळक मुद्देखंडणी दरोडा विरोधी पथकाची कामगिरीदिघी पोलीस ठाण्यात तीन, आळंदी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल

पिंपरी : एका तडीपार गुन्हेगारास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली.अविनाश बाळू धनवे (वय २८, रा. वडमुखवाडी, चऱ्होली ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. तडीपार गुन्हेगार अविनाश धनवे हा लग्नाच्या कार्यक्रमासाठी आळंदी येथे आला आहे. त्याच्याकडे पिस्तूल आहे, अशी माहिती गस्तीवरील पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून धनवे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे असा ३० हजार ८०० रुपयांचा ऐवज मिळून आला. तो ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. धनवे याच्यावर दिघी पोलीस ठाण्यात तीन, आळंदी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. तसेच त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. असे असतानाही त्याने तडीपारीच्या आदेशाचा भंग करून पुणे जिल्ह्यात प्रवेश केल्याबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल लोहार, पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर, पोलीस कर्मचारी आशिष बनकर, गणेश कोकणी, सुधीर डोळस, राजेश कौशल्ये यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस