शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
2
भाजपचे उमदेवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
3
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
4
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
5
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
6
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
7
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
8
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
9
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
10
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
11
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
12
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
13
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
14
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
15
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
16
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
17
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
18
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
19
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
20
फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडी अपघात प्रकरणी चौघांवर गुन्हा; बसचालकासह दोघांना पोलिस कोठडी 

By नारायण बडगुजर | Updated: December 2, 2025 18:37 IST

दारूच्या नशेतील चालकाने बस भरधाव चालवून तीन भावंडांना चिरडले. यात तिघांचा मृत्यू झाला.

पिंपरी : दारूच्या नशेतील चालकाने बस भरधाव चालवून तीन भावंडांना चिरडले. यात तिघांचा मृत्यू झाला. तर एका महिलेसह तिघे जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. १ डिसेंबर) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास हिंजवडी येथील पंचरत्न चौक येथे घडली. याप्रकरणी बसचालकासह दोघांना मुळशी न्यायालयात हजर केले असता गुरुवारपर्यंत (दि. ४ डिसेंबर) पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

बसचा चालक नागनाथ राजाभाऊ गुजर (वय ३३, रा. गौरी पार्किंग, चक्रपाणी रोड, भोसरी, मूळ रा. धाराशिव), सबवेंडर व व्यवस्थापक भाऊसाहेब रोहिदास घोमल (वय ४८, रा. चिंचवड, मूळ रा. अहिल्यानगर) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह मैत्रेय ट्रॅव्हल्सचे मालक, ड्रायव्हरची सुरक्षा तपासणी करण्याची जबाबदारी असलेली व्यक्ती यांच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. स्वप्नील पांडुरंग जांभुळकर (२४, रा. पंचरत्न चौक, हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. प्रिया देवेंद्र प्रसाद (वय १६), आर्ची देवेंद्र प्रसाद (८) या दोन बहिणींसह त्यांचा भाऊ सूरज देवेंद्र प्रसाद (६) या तिघांचा या अपघातात मृत्यू झाला. दुचाकीस्वार अविनाश हरिदास चव्हाण (वय २६) हे गंभीर जखमी झाले. नूर आलम (वय २६) आणि विमल राजू ओझरकर (वय ४०) हे दोघेही यात जखमी झाले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसचालक नागनाथ गुजर याने दारूच्या नशेत मैत्रेय ट्रॅव्हल्सची एमएच १४ एलएल ७२३३ या क्रमांकाची बस हिंजवडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून वाकड पुलाच्या दिशेने भरधाव घेऊन जात होता. त्यावेळी पंचरत्न चौकात दुचाकीस्वार अविनाश चव्हाण यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर बसने पदपथावरील पादचारी प्रिया प्रसाद व आर्ची प्रसाद या दोन बहिणींसह त्यांचा भाऊ सूरज प्रसाद यांना जोरदार धडक दिली. यात आर्ची आणि सूरज यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच नूर आलम आणि फिर्यादी स्वप्नील जांभुळकर यांची आत्या विमल ओझरकर यांनाही बसने धडक दिली. बसने पदपथ, इलेक्ट्रिक डीपी व होर्डिंगचेही नुकसान केले.

वाहनमालक व देखरेख करणारे अधिकारी यांनी बसचालक मद्यधुंद असल्यस अपघात होऊ शकतो आणि लोकांचा मृत्यू होऊ शकतो याची  माहिती असताना त्यांनी बसचालकाची तपासणी न करता वाहन चालविण्यास दिल्याबद्दल जबाबदारी निश्चित केली आहे. त्यानुसार मैत्रेय ट्रॅव्हल्सचे मालक, सबवेंडर व व्यवस्थापक तसेच ड्रायव्हरची सुरक्षा तपासणी करण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तीच्या विरोधात देखील याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक विकास ताकतोडे तपास करीत आहेत.  

मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात

अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रिया प्रसाद व अविनाश चव्हाण यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान प्रिया हिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन केले. तसेच आर्ची आणि सूरज या दोघांचे सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तिघांचे मृतदेह मंगळवारी (दि. २ डिसेंबर) नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Four charged in Hinjawadi accident; bus driver remanded to custody.

Web Summary : Drunk bus driver kills three siblings in Hinjawadi. Driver and manager arrested; owners charged with negligence. Incident occurred near Pancharatna Chowk.
टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातPune Crimeपुणे क्राईम बातम्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड