शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्र्याच्या मुलासह माजी सरपंच, ग्रामपंचायतीच्या माजी सदस्याला अटक; वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना ठोकल्या बेड्या

By नारायण बडगुजर | Updated: May 26, 2025 22:54 IST

याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यात कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील यालाही अटक करण्यात आली आहे. यासोबतच एक माजी सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या एका माजी सदस्याचाही यात समावेश आहे.

पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तिचा सासरा राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे हे दोघे फरार होते. त्यांनी पलायन केले त्यावेळी त्यांना काही जणांनी मदत केली. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यात कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील यालाही अटक करण्यात आली आहे. यासोबतच एक माजी सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या एका माजी सदस्याचाही यात समावेश आहे.

प्रीतम वीरकुमार पाटील (४७, रा. कोगनोळी, ता. चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक), मोहन उर्फ ​​बंडू उत्तम भेगडे (६०, रा. वडगाव मावळ), बंडू लक्ष्मण फाटक (५५, रा. लोणावळा), अमोल विजय जाधव (३५, रा. पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा), राहुल दशरथ जाधव (४५, रा. पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

वैष्णवी हगवणे (वय २३) हिने मुळशी तालुक्यातील भुकूम येथे १६ मे रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी १७ मे रोजी बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे हा आपला मुलगा सुशील याच्यासह पसार झाला होता. पोलिसांना चकवा देण्यासाठी अनेक वाहने बदलून फार्म हाउस आणि लाॅजवर आश्रय घेतला. त्यासाठी अनेक जणांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या पितापुत्राला मदत केली. त्यांना आर्थिक मदत करून आश्रय देखील दिला. त्यामुळे पोलिसांना चकवा देणे त्यांना शक्य झाले. सात दिवसानंतर त्यांना पुण्यातील स्वारगेट येथून अटक करण्यात आली. दरम्यान त्यांनी वडगाव मावळ, लोणावळा, सातारा तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आश्रय घेतल्याचे समोर आले आहे. त्यावरून पोलिसांनी संशयितांना आश्रय देणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे.

अटक केलेल्या पाच जणांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यांच्याकडे सखोल चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. आरोपी हगवणे फरार असताना नेमक्या काय हालचाली झाल्या, कोणकोण सहभागी होते, याचा तपास पोलीस करत आहेत. या अटकेनंतर आणखी काही महत्त्वाची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजकीय पदाधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ

प्रीतम पाटील हा कर्नाटकातील माजी उर्जामंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा आहे. वीरकुमार पाटील हे २८ वर्षे काँग्रेसचे आमदार होते. बंडू लक्ष्मण फाटक हा मुळशी तालुक्यातील शिरोली चांदोली या गावाचा माजी सरपंच आहे. मोहन उर्फ ​​बंडू उत्तम भेगडे हा वडगाव मावळ ग्रामपंचायतीचा माजी सदस्य व भाजपचा वडगाव मावळ शहराचा माजी अध्यक्ष आहे. बंडू भेगडे याची पत्नी मंगल भेगडे या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आहेत. पुसेगाव येथील अमोल जाधव आणि राहुल जाधव हे शेतकरी असून त्यांच्याकडे हगवणे यांनी बैल सांभाळण्यासाठी दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.

राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार असताना त्यांना काहीजणांनी मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार, प्रीतम पाटील याच्यासह पाच जणांना अटक केली आहे.- विशाल गायकवाड, उपायुक्त, परिमंडळ दोन, पिंपरी- चिंचवड.

टॅग्स :Vaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेPuneपुणेPoliceपोलिस