शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या सायबर सेलला कृष्ण प्रकाश यांचा विसर; आयुक्त म्हणून संदीप बिष्णोई यांची डिजिटल सिग्नेचर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 07:45 IST

पोलीस स्मार्ट, वेबसाईटचे काय : ऑनलाईन तक्रारकर्त्यांचा होतोय गोंधळ 

ठळक मुद्देसप्टेंबरमध्ये बिष्णोई यांची बदली; कृष्ण प्रकाश ५ सप्टेंबरला पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त

पिंपरी : शहर पोलीस दलाला ‘स्मार्ट’ करण्याचा विडा उचललेल्या पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा आयुक्तालयाच्या सायबर सेलला विसर पडलेला आहे. इ-तक्रार करणाऱ्या तक्रारदारांना अद्यापही तत्कालीन पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याच डिजिटल सिग्नेचरचे पत्र दिले जात आहे. त्यामुळे नेमके आयुक्त कोण आहेत, पोलीस स्मार्ट होताहेत मात्र आयुक्तालयाच्या वेबसाईटचे काय, असा सवाल ऑनलाईन तक्रारकर्त्यांकडून केला जात आहे.   

तत्कालीन आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या कार्यकाळात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे संकेतस्थळ कार्यान्वित झाले. या संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यानुसार नागरिकांनी त्यांच्या तक्रारी संकेतस्थळावरून नोंदविण्यास सुरवात केली. नोंदविलेल्या तक्रारीची पीडीएफ फाईल संबंधित तक्रारदारांना उपलब्ध करून दिली जाते. त्यावर पोलीस आयुक्तांचे नाव तसेच डिजिटल सिग्नेचर असते. बिष्णोई यांच्या कार्यकाळात ही सुविधा उपलब्ध झाल्याने त्यांचे नाव सिग्नेचर देण्यात येते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये बिष्णोई यांची बदली झाली. कृष्ण प्रकाश यांनी ५ सप्टेंबर रोजी पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. 

पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र सायबर सेल कार्यान्वित आहे. या सेलकडून आयुक्तालयाचे संकेतस्थळ अद्ययावत केले जाते. आयुक्तांची बदली झाल्यानंतर त्यांची डिजिटल सिग्नेचर बदलणे आवश्यक आहे. मात्र तसे न झाल्याने अद्यापही संदीप बिष्णोई यांची डिजिटल सिग्नेचर असलेले कागदपत्र संकेतस्थळावरून उपलब्ध होत आहेत.

तांत्रिकबाबींमुळे नागरिकांना नाहक त्रासतक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयीन कामकाजासाठी तक्रारीसंबंधित कागदपत्रे सादर केली जातात. त्यावर सध्या कार्यरत आयुक्तांची डिजिटल सिग्नेचर नसल्याने गोंधळाची शक्यता आहे. या तांत्रिक बाबीमुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.   

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची डिजिटल सिग्नेचर वापरणे ही बाब माहिती अधिकार कायद्यानुसार चुकीचे व गैर जबाबदारीचे लक्षण आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे सायबर सेल असतानाही असे प्रकार व्हावेत हे गंभीर आहे. - डाॅ. अभिषेक हरिदास, कार्यालयीन अधीक्षक, हमारा विश्व फाऊंडेशन

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसcommissionerआयुक्तdigitalडिजिटल