शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत पदाधिकारी व अधिकाऱ्यांना परदेशवारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 20:25 IST

महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट सिटी संचालक आणि अधिकारी असे सात जणांना बार्सिलोना व स्पेन दौरा घडविला जाणार आहे.

ठळक मुद्देस्पेनमधील बार्सिलोना येथे १३ ते १५ नोव्हेंबरला स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड काँग्रेस २०१८ चे आयोजन सन्माननीय सदस्यांच्या दौऱ्यासाठी असणाऱ्या रकमेतून हा खर्च केला जाणार सुमारे २० लाखांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता

पिंपरी : महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत पदाधिकारी आणि अधिकारी परदेशवारीचे आयोजन केले आहे. स्मार्ट सिटी संचालक आणि अधिकारी असे सात जणांना बार्सिलोना व स्पेन दौरा घडविला जाणार आहे. त्यासाठी सुमारे २० लाखांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.स्पेनमधील बार्सिलोना येथे १३ ते १५ नोव्हेंबरला स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड काँग्रेस २०१८ चे आयोजन केले आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे सदस्य सहभागी होणार आहेत. याबाबत एसएएआरसी अर्थात स्मार्ट सिटी वल्ड काँग्रेस या संस्थेकडून महापालिकेला निमंत्रित करण्यात आले आहे. महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, मनसे गटनेते सचिन चिखले, संचालक प्रमोद कुटे, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी नीळकंठ पोमण, सह शहर अभियंता राजन पाटील आदी सहभागी होणार आहेत. २० लाखांच्या खर्चास मान्यता सन्माननीय सदस्यांच्या दौऱ्यासाठी असणाऱ्या रकमेतून हा खर्च केला जाणार आहे. या दौऱ्यासाठी १४ लाख ४३ हजार ७५० रुपये नगरसचिव विभागाकडील लेखाशीर्षावरील रक्कम, तसेच स्मार्ट सिटीचे अधिकाऱ्यांच्या दौऱ्यासाठी होणारा ५ लाख ७७ हजार हा माहिती तंत्रज्ञान विभागाकडील तरतूद अशा एकूण २० लाख २१ हजारांच्या खर्चास स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली आहे. ——————स्थायी समितीचे सदस्य विलास मडिगेरी म्हणाले, स्मार्ट सिटीसाठी स्वतंत्र निधी आहे. त्यामुळे अशा दौºयांचे खर्च स्मार्ट सिटीतूनच करायला हवेत. महापालिकेच्या इतर लेखाशीर्षातून  करणे अयोग्य आहे. 

टॅग्स :PuneपुणेSmart Cityस्मार्ट सिटी