शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मोशीतील ‘क्वारंटाईन सेंटर’मध्ये परवाना नसलेल्या संस्थेला अन्नपुरवठ्याचे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 17:04 IST

अन्न व औषध परवानगी विभागाने केलेल्या तपासणीत संबंधित अन्न पुरवठादार दोषी आढळल्याने दंडात्मक कारवाई 

ठळक मुद्देमोशीतील मागासवर्गीय वसतीगृहात क्वारंटाईन सेंटरमध्ये एकूण २१० नागरिक

पिंपरी : मोशीतील ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटर’ मधील नागरिकांना अन्नपुरवठा करणाऱ्या संस्थेकडे अन्न परवानाच नसल्याचे उघड झाले आहे. अन्न व औषध परवानगी विभागाने केलेल्या तपासणीत संबंधित अन्न पुरवठादार दोषी आढळले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ११ हजार रुपये दंडात्मक कारवाई केली.पिंपरी - चिंचवड महापालिकेने मोशीतील मागासवर्गीय वसतीगृहात क्वारंटाईन सेंटर उभारले असून तिथे कोरोना संशयितांना ठेवले जात आहे. एकूण २१० नागरिक त्या ठिकाणी क्वारंटाइन केले आहे. मात्र, येथे नागरिकांच्या आरोग्याची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचा प्रकार उघड झाला. याठिकाणी नागरिकांना सकाळचा नाश्ता, दोन वेळचे जेवण आणि पाणी देण्यासाठी महापालिका एका व्यक्तीमागे ४५० रुपये खर्च करते. मात्र, त्याचा दर्जा सुमार आहे.नागरिकांचे वैद्यकीय अहवाल हे उशिरा येत असून जेवण आणि इतर सुविधा मिळत नसल्याचा येथील नागरिकांचा आरोप आहे. जेवण आणि नाष्टयात अळ्या सापडतात. बाथरूममध्ये बकेट आणि मग नसतात, अशा तक्रारी करत संतापलेल्या नागरिकांनी तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता. त्यात जेवणाबाबतच्या तक्रारींचा समावेश अधिक आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. क्वारंटाईन सेंटरसाठी महापालिकेने पुरेसे मनुष्यबळ तैनात केले आहे. मात्र, बहुतांश कर्मचारी गैरहजर असतात. महापालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. जेवणाबाबत अनेकांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यांनी केलेल्या चौकशीत संबंधित संस्था दोषी आढळली आहे. त्यामुळे त्यांच्यावर ११ हजार रुपयेदंडात्मक कारवाई केली आहे.  महापालिका भांडार विभागाचे सहायक आयुक्त मंगेश चितळेम्हणाले, टॅब किचन या संस्थेने अन्न परवाना असल्याचे सांगितले होते. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या चौकशीत परवाना नसल्याचे समोर आले असेल तर त्याची पडताळणी केली जाईल.मोशीतील मागासवर्गीय वसतीगृहात क्वारंटाईन सेंटरमधील जेवणाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. जेवणात केस आढळल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तपासणी केली. त्यात संबंधित अन्न पुरवठादार दोषी आढळले आहेत. त्यांच्याकडे अन्न परवाना नाही. चुकीचा अन्न परवाना आहे. केटरिंग परवाना ऐवजी त्यांनी केवळ रजिस्ट्रेशन घेतले होते. लहान परवानगी आहे. आवश्यक परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर ११ हजार रुपये दंडात्मक कारवाई केली आहे.   बाणेर येथील किचनची देखील तपासणी केली जाणार आहे.- संजय नारगुडे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

टॅग्स :moshiमोशीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग