पिंपरीत शंभर टक्के शास्ती कर माफ व्हावा यासाठी उध्दव ठाकरेंकडे पाठपुरावा करु : बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 03:36 PM2020-02-11T15:36:21+5:302020-02-11T15:43:10+5:30

शहरातील नागरिकांवर लादण्यात आलेला शास्तीकर सरसकट रद्द करावा अशा मागणीचे पत्र

Follow from Uddhav Thackeray to get 100 percent penalty tax in Pimpri : Balasaheb Thorat | पिंपरीत शंभर टक्के शास्ती कर माफ व्हावा यासाठी उध्दव ठाकरेंकडे पाठपुरावा करु : बाळासाहेब थोरात

पिंपरीत शंभर टक्के शास्ती कर माफ व्हावा यासाठी उध्दव ठाकरेंकडे पाठपुरावा करु : बाळासाहेब थोरात

Next

पिंपरी : महानगरपालिकेत असणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर लावलेला शास्तीकर सरसकट माफ करावा ही या नागरिकांची रास्त मागणी आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करु असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
     पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेसचे शिष्टमंडळ मंगळवारी  मुंबईत महसूल मंत्री थोरात यांना भेटले. यावेळी साठे यांनी शहरातील नागरिकांवर लादण्यात आलेला शास्तीकर सरसकट रद्द करावा अशा मागणीचे पत्र थोरात यांना दिले. यावेळी माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, अनुसूचित जाती विभाग प्रदेश उपाध्यक्ष गौतम आरकडे, महिला प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, प्रदेश कार्यकारीणी सदस्या निगार बारसकर, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत नेवाळे, शाम अगरवाल, प्रदेश युवक सरचिटणीस मयूर जयस्वाल, सेवादलाचे शहराध्यक्ष मकर यादव, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, शहर उपाध्यक्ष क्षितीज गायकवाड आदी उपस्थित होते.

Web Title: Follow from Uddhav Thackeray to get 100 percent penalty tax in Pimpri : Balasaheb Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.