शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी महापालिकेतील नागर विभाग सहायक आयुक्तांच्या खुर्चीला हार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 13:49 IST

संतापलेल्या प्रहार आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी नागरवस्ती विभागाच्या सहाय्यक सहायक आयुक्तांच्या रिकाम्या खुर्चीलाच हार घालून प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा अभिनव पद्धतीने निषेध केला.

पिंपरी : महापालिका मुख्यालयात सभावृत्तांत घेण्यासाठी आलेल्या प्रहार आंदोलनाच्या पदाधिका-यांनी दोन तास वाट पाहूनही नागरवस्ती विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे उपस्थित राहिल्या नाहीत. त्यामुळे संतापलेल्या या पदाधिकाऱ्यांनी झगडे यांच्या रिकाम्या खुचीर्लाच हार घालून प्रशासनाच्या नाकर्तेपणाच्या भुमिकेचा अभिनव पद्धतीने निषेध केला.दिव्यांग नागरिकांना ताटकळत ठेवल्याने संताप व्यक्त केला जात असून झगडे यांच्या कार्यपद्धतीवर दिव्यांग नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. प्रहार अपंग क्रांती आंदोलन संस्था आणि नागरवस्ती विकास योजना विभागाची एकत्रित सभा पार पडली होती. या सभेचा वृत्तांत घेण्यासाठी पदाधिकारी या विभागात आले. सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांच्याकडून ही माहिती मिळणे अपेक्षित होते. त्याकरिता महापालिका मुख्यालयाच्या तळमजल्यावर असलेल्या नागरवस्ती विभागात हे सर्व पदाधिकारी त्यांची भेट घेण्यासाठी सकाळी आले होते. मात्र, या विभागाचा  एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने दिव्यांग नागरिकांनी दोन तास वाट पाहिली. एक वाजले तरी एकही अधिकारी कार्यालयात हजर झाला नाही. त्यामुळे दिव्यांग पदाधिका-यांच्या सहनशीलतेचा अंत झाला. या पदाधिका-यांनी बाहेरून एक हार मागवून सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांच्या रिकाम्या खुर्चीला घालून, प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध केला. दिव्यांग नागरिकांना ताटकळत ठेवल्याने संताप व्यक्त केला जात असून झगडे यांच्या कार्यपद्धतीवर दिव्यांग नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. पाठपुरावा करुनही अपंग विभागासाठी स्वतंत्र उपायुक्त नेमणे व शहरात होत असलेल्या अपंग भवनाबाबत संघटनेबरोबर बैठक घेण्याबाबत निर्णय होत नाही. झालेल्या सभेचा वृत्तांत मिळत नसल्याने संघटनेच्या वतीने अध्यक्ष दत्तात्रय भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले.

टॅग्स :PuneपुणेPrahar Apang Krantiप्रहार अपंग क्रांती