शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरीतील पूरग्रस्तांना महिन्याभरानंतरही मिळाला नाही मदतनिधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 17:51 IST

पवना, मुळा व इंद्रायणी या नद्यांना गेल्या महिन्यात मोठा पूर आला होता.

ठळक मुद्देशासनाकडे साडेतीन कोटीचा प्रस्ताव : शहरात ४८८० कुटुंबांना बसली पुराची झळ 

-  नारायण बडगुजर- पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील पूरग्रस्त कुटुंबांना शासनाकडून धान्य तसेच १५ हजारांची मदत जाहीर करण्यात आली. शहरात ४८८० कुटुंब पूरग्रस्त असून त्यातील १५०६ कुटुंबांना मदतीची पूर्ण रक्कम मिळाली. उर्वरित ३३७४ कुटुंबांना केवळ पाच हजार रुपये देण्यात आले असून, महिनाभरानंतरही या पूरग्रस्तांना दहा हजार रुपये मिळालेले नाहीत. तसेच त्यांच्या बँकेचा खाते क्रमांक, आयएफएससी कोड, नावातील घोळ आदी तांत्रिक अडचणीही समोर येत आहेत. या पूरग्रस्त कुटुंबांसाठी सुमारे साडेतीन कोटींची मागणी महसूल विभागातर्फे शासनाकडे करण्यात आली आहे.     गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पूरस्थिती होती. त्यामुळे पूरग्रस्त भागात पंचनामे करून पूरग्रस्तांसाठी शासनातर्फे धान्य तसेच आर्थिकस्वरुपात मदत जाहीर करण्यात आली. त्यासाठी शहरात पूरग्रस्त भागात पंचनामे करण्यात आले. मंडलाधिकारी यांच्या उपस्थितीत सुमारे ६० कर्मचाºयांनी पंचनामे केले. त्यानुसार शहरात ४८८० कुटुंबे पूरग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. या प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू आणि १० किलो तांदूळ असे धान्यवाटप करण्यात आले. तसेच पहिल्या टप्प्यात १५०६ पूरग्रस्त कुटुंबांना १५ हजारांचा मदतनिधी उपलब्ध करून देण्यात आला. उर्वरित ३३७४ पूरग्रस्त कुटुंबांना केवळ पाच हजार रुपये मिळाले असून, आणखी १० हजार रुपये मिळण्याची त्यांना प्रतीक्षा आहे. पूरग्रस्तांची माहिती एका राष्ट्रीयकृत बँकेकडे देण्यात आली आहे. मात्र पूरग्रस्तांची संख्या जास्त असल्याने या बँकेतील यंत्रणेचाही गोंधळ उडाला आहे..................बँकेने इंग्रजीत मागविली माहितीपूरग्रस्तांचा बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड, मोबाइल क्रमांक, नाव आदी माहिती बँकेला उपलब्ध करून देण्यात आली. मात्र बँकेचे कामकाज इंग्रजीतून होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ही सर्व माहिती इंग्रजीत करून देण्यात आली. असे करताना नावाचे स्पेलिंग, खाते क्रमांक, आयएफएससी कोड आदी चुका समोर आल्या आहेत. परिणामी त्याची दुरुस्ती करण्यात महसूल विभागातील कर्मचारी गुंतले आहेत. हीच माहिती राज्य शासनाच्या ट्रेझरी विभागाकडे मराठी भाषेत देण्यात आली. 

पिंपरीत सर्वाधिक २४२० कुटुंबपवना, मुळा व इंद्रायणी या नद्यांना गेल्या महिन्यात मोठा पूर आला होता. पुराचे तसेच पावसाचे पाणी नदीकाठच्या घरांमध्ये व झोपडपट्ट्यांमध्ये शिरले होते. त्यामुळे अनेक कुटुंबांना याची झळ बसली. महसूल विभागाने पंचनामे केले असून त्यानुसार झोपडपट्टी बहुल असलेल्या पिंपरीत सर्वाधिक २४२० कुटुंबे पूरग्रस्त असल्याचे समोर आले आहे.  

पूरग्रस्तांसाठी साडेतीन कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. शासनाकडे त्याबाबत प्रस्ताव पाठविलेला आहे. बँकेला पूरग्रस्तांची माहिती दिली आहे. पूरग्रस्तांचा खाते क्रमांक, बँकेच्या शाखेचा आयएफएससी कोड आदींमध्ये चुका असल्यास त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर पूरग्रस्तांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा होईल.- गीता गायकवाड, अपर तहसीलदार, पिंपरी-चिंचवड ...........पंचानामे केल्यानुसार विभागनिहाय पूरग्रस्त कुटुंबेसांगवी - ६१५रहाटणी - २६७पिंपळे गुरव - १६५कासारवाडी - ३१८दापोडी - ८६८बोपखेल - ६४फुगेवाडी - ६४पिंपरी - २४२०चिंचवड - ४९रावेत - ५०एकूण - ४८८०

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfloodपूरriverनदीRainपाऊस