झोपडपट्ट्यांमध्ये दारूचा महापूर
By Admin | Updated: February 20, 2017 02:50 IST2017-02-20T02:50:11+5:302017-02-20T02:50:11+5:30
निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असल्याने मद्य विक्रीवर बंदी आहे. तरीही झोपडपट्ट्यांमध्ये उमेदवारांकडून मतदारांना

झोपडपट्ट्यांमध्ये दारूचा महापूर
पिंपरी : निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असल्याने मद्य विक्रीवर बंदी आहे. तरीही झोपडपट्ट्यांमध्ये उमेदवारांकडून मतदारांना रोज दारूचा साठा उपलब्ध करून दिला जात आहे. पिंपरीतील लालटोपीनगर, नेहरूनगर, भाटनगर, तसेच आनंदनगर, विद्यानगर, दत्तनगर, रामनगर, बालाजीनगर, कासारवाडी, निगडी ओटा स्कीम या परिसरात मोठ्या प्रमाणावर दारू उपलब्ध करून दिली जात आहे. पिंपरीत निवडणूक कालावधीत मोठा साठा आला असून, त्यामध्ये बनावट मद्याचा समावेश असण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)