शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘पॉझिटिव्ह’आरोपीच्या संपर्कात आलेले पाच पोलीस क्वारंटाईन;शहर पोलीस दलात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 20:05 IST

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात सात पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

ठळक मुद्देदुसऱ्या जिल्ह्यात रवाना करण्यात आलेल्या आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर

पिंपरी : एका संशयित आरोपीला पोलिसांनी पोलीस चौकीत आणले होते. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याच्या थेट संपर्कात आलेल्या पाच पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात सात पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील एका सहायक पोलीस निरीक्षकाचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता सहा पोलीस कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. असे असतानाच एका संशयित आरोपीचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. शहरातील एका पोलीस चौकीतील पोलिसांनी या संशयित आरोपीला पोलीस चौकीत आणले होते. त्यासाठी पोलीस त्याच्या घरी गेले होते. त्यामुळे या पोलिसांचा त्या आरोपीशी थेट संपर्क आला होता. त्याला चौकीतून सोडून देण्यात आले. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. ही बाब माहिती झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या पाच पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोना चाचणीसाठी या पोलिसांच्या घशातील द्रवाचे नमुने घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्रतीक्षेत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शहरातील एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या जिल्ह्यात रवाना करण्यात आलेल्या आरोपीलाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यावेळीही त्या आरोपीच्या संपर्कात आलेल्या पोलिसांची तपासणी करण्यात आली होती. मात्र त्यांचे कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. त्यामुळे संबंधित पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस