शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीत पाच नवीन सदस्यांची वर्णी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 20:34 IST

पिंपरी : पिंपरी - चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीत वर्णी लागावी म्हणून सत्ताधारी पक्षात चुरस लागली आहे. ही निवड २० मार्चच्या सर्वसाधारण सभेत होणार आहे.

ठळक मुद्देभाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी पाच वर्षांत ५५ सदस्यांना संधी देणार असे जाहीर केले होते. अध्यक्षपदा निवडणूक प्रक्रिया पार पडल्यावर भाजप नेतृत्त्वाने शुक्रवारी राजीनामे मंजूर करण्यास हिरवा कंदील दाखविला.

पिंपरी : पिंपरी - चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने पाच वर्षात अधिक नगरसेवकांना स्थायी समितीत संधी देण्याचे धोरण अवलंबले आहे . चिठ्ठीतून वाचलेल्या भाजपाच्या चार आणि अपक्ष एक अशा पाच जणांचे राजीनामे भाजपाने घेतले होते. हे राजीनामे महापौर नितीन काळजे यांनी मंजूर केले आहे. त्यामुळे पाच नवीन सदस्यांची वर्णी स्थायी समितीवर लागणार आहे. ही निवड २० मार्चच्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. स्थायी समितीत वर्णी लागावी म्हणून सत्ताधारी पक्षात चुरस लागली आहे.    महापालिका स्थायी समितीत १६ सदस्य असून त्यात भाजपाचे दहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, शिवसेनेचा एक आणि अपक्ष एकाचा समावेश आहे. पहिल्या वर्षांनंतर त्यातील आठ सदस्य चिठ्ठीद्वारे निवृत्त होतात. यावर्षी सत्ताधाऱ्यांनी स्थायी समितीवर अधिक सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी, म्हणून अकराही सदस्यांचे राजीनामे भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी घेतले होते. व पाच वर्षांत ५५ सदस्यांना संधी देणार असे जाहीर केले होते. त्यानंतर लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यात अध्यक्षा सीमा सावळे, आशा शेंडगे, कुंदन गायकवाड, उषा मुंडे, कोमल मेवानी, हर्षल ढोरे हे भाजपचे सहा सदस्य चिठ्ठीद्वारे बाहेर पडले. त्यानंतर, या सदस्यांच्या जागेवर नव्याने नियुक्ती केली. या ड्रॉ पध्दतीमध्ये भाजपचे लक्ष्मण उंडे, प्रा.उत्तम केंदळे, माधुरी कुलकर्णी आणि निर्मला कुटे, तसेच अपक्ष कैलास बारणे हे बचावले होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला अडचण येऊ नये यासाठी भाजपने चिठ्ठीतून बचाविलेल्या स्थायी समिती सदस्यांचे राजीनामे मंजूर केले नव्हते. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यावर भाजप नेतृत्त्वाने शुक्रवारी राजीनामे मंजूर करण्यास हिरवा कंदील दाखविला. त्यानुसार, महापौर नितीन काळजे यांनी राजीनामे मंजूर केल्याचे लेखी पत्र नगरसचिव विभागाला दिले. आता स्थायी समितीत भाजपच्या चार आणि अपक्षांची एक जागा रिक्त झाली आहे. रिक्त झालेल्या जागांवर नवीन सदस्यांची मार्च महिन्याच्या सर्वसाधारणसभेत नियुक्ती केली जाणार आहे.   नेत्यांचे उंबरे झिजविताहेत नगरसेवकरिक्त झालेल्या पाच जागांवर संधी मिळावी, म्हणून भाजपाच्या नगरसेवकांनी नेत्यांकडे साकडे घातले आहे. याच समितीत संधी मिळावी, म्हणून नगरसेवक नेत्यांचे उंबरे झिजवित आहेत. या रिक्त जागांवर कोणाला संधी मिळणार याबाबत महापालिका वतुर्ळात चर्चा रंगली आहे. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपा