पाच नगरसेवकांचा राजीनामा
By Admin | Updated: January 28, 2017 00:29 IST2017-01-28T00:29:05+5:302017-01-28T00:29:05+5:30
भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप समर्थक शिवसेनेच्या नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे, संगीता भोंडवे, राष्ट्रवादीचे नगरसवेक बाळासाहेब

पाच नगरसेवकांचा राजीनामा
पिंपरी : भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप समर्थक शिवसेनेच्या नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे, संगीता भोंडवे, राष्ट्रवादीचे नगरसवेक बाळासाहेब तरस, माया बारणे यांनी राजीनामा दिला आहे. पाचही जण भाजपात प्रवेश करणार आहेत. गेले महिनाभर युती आणि आघाडीची चर्चा सुरू असल्याने काही नगरसेवक कोणत्या पक्षातून निवडणूक लढवायची याबाबत संभ्रमात होते. भाजपा-शिवसेनेची युती संपुष्टात आल्यानंतर उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या पहिल्या दिवशीच राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील पाच नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. शिवसेनेच्या तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन अशा पाच नगरसेवकांनी शुक्रवारी आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला आहे. (प्रतिनिधी)