पाच नगरसेवकांचा राजीनामा

By Admin | Updated: January 27, 2017 17:34 IST2017-01-27T17:34:16+5:302017-01-27T17:34:16+5:30

पाच नगरसेवकांचा राजीनामा

Five corporators resign | पाच नगरसेवकांचा राजीनामा

पाच नगरसेवकांचा राजीनामा

 

पिंपरी : भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप समर्थक शिवसेनेच्या नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे, संगीता भोंडवे, राष्टÑवादीचे नगरसवेक बाळासाहेब तरस, माया बारणे यांनी नगरसेवक  राजीनामा दिला आहे.  पाचही नगरसेवक  भाजपात प्रवेश करणार आहेत. 

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महिन्यापूर्वी भोसरी विधानसभा मतदार सघांतील काँग्रेस, मनसे आणि राष्टÑवादी आणि अपक्ष अशा नऊ नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर गेले महिनाभर युती आणि आघाडीची चर्चा सुरू असल्याने काही नगरसेवक कोणत्या पक्षातून निवडणूक लढवायची याबाबत संभ्रमात होते. भाजपा शिवसेनेची युती संपुष्टात आल्यानंतर उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या पहिल्या दिवशीच राष्टÑवादी आणि शिवसेनेतील पाच नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. शिवसेनेच्या तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन अशा पाच नगरसेवकांनी  शुक्रवारी  महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. 

 

Web Title: Five corporators resign