महापालिकेत प्रथमच महिला सहायक आयुक्त

By Admin | Updated: June 17, 2016 05:09 IST2016-06-17T05:09:03+5:302016-06-17T05:09:03+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सहायक आयुक्तपदी स्वाती झगडे यांची नियुक्ती झाली आहे. मुख्य लेखापाल म्हणून राजेश लांडे यांची नियुक्ती केली आहे. सहायक आयुक्तपदी रुजू होणाऱ्या

First time female assistant commissioner in municipal corporation | महापालिकेत प्रथमच महिला सहायक आयुक्त

महापालिकेत प्रथमच महिला सहायक आयुक्त

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सहायक आयुक्तपदी स्वाती झगडे यांची नियुक्ती झाली आहे. मुख्य लेखापाल म्हणून राजेश लांडे यांची नियुक्ती केली आहे. सहायक आयुक्तपदी रुजू होणाऱ्या प्रतिनियुक्तीवरील अधिकारी म्हणून झगडे या पहिल्याच अधिकारी ठरतील.
नागरवस्ती विकास विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत खांडकेकर यांची काही महिन्यांपूर्वीच बदली झाली होती. मात्र, त्यांना नियुक्ती न मिळाल्याने ते महापालिकेत कार्यरत आहेत. दरम्यान, खांडकेकर यांची बीड नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता पुणे विभागीय कार्यालयात सहायक संचालक नगरपालिका प्रशासन या पदावर कार्यरत असलेल्या स्वाती झगडे यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे प्रथमच प्रतिनियुक्तीवरील सहायक आयुक्त म्हणून झगडे रुजू होतील. यासह मुख्य लेखापाल प्रमोद भोसले यांचीही सोलापूर महापालिकेत बदली झाली आहे. तरीही महापालिकेत कार्यरत होते. आता त्यांच्या जागी राजेश लांडे यांची नियुक्ती केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: First time female assistant commissioner in municipal corporation